पावसात भिजलेल्या
माणसाची कथा
अव्यक्त
अवर्णनीय
दर्पोक्त वारा
भीषण सुटलेला
पिसाटलेला
निर्ढावलेला
प्रकाशाची लकेर
अदृश्य झालेली
थिजलेली
बुजलेली
प्रतिकुलतेचा “सामना”
कणखर सिंहगर्जना
भिजत, गर्जत
उभा ठाकला
पावसात भिजलेल्या
माणसाची किमया
वारा बुजला
लकेर चमकली
काळ्याकभिन्न रात्रीला,
अंधाराला छेदून
सूर्योदयाची नांदी
उमटून आली.
लेखन – विजय वरखडे
मो. : 9579579895