मुळशीत ४८ गावांमध्ये येणार महिला राज, सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर

0
1766

विजय वरखडे, 9579579895

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  मुळशीतील ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज कासार आंबोली येथे पार पडला. मुळशी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीपैकी तब्बल ४८ गावातील सरपंच पद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. तर ५४ जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असून यामध्ये महिलांना २७ जागा आरक्षित झालेल्या आहेत. कासारआंबोली, ता.मुळशी येथील सैनिकी शाळेत तहसिलदार अभय चव्हाण, नायब तहसिलदार भगवान पाटील यांनी ही सोडत आज जाहीर केली. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी, ग्रामस्थं उपस्थित होते.

            ९५ पैकी ४५ गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहिर होणार असल्याने त्याच्या सरपंच पदाबाबत मोठी उत्सुकता होती. यामध्ये हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सुस, घोटवडे, अंबडवेट, कासार आंबोली, पौड, लवळे, भुकूम, आंबवणे, म्हाळुंगे या ग्रामपंचायती बाबत येथील ग्रामस्थांना विशेष उत्सुकता होती. आयटीनगरी हिंजवडीचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने हिंजवडीकर इच्छूक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे हिंजवडीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे. तर आयटीव्हिलेज माणमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने माणमध्ये मात्र थोडीशी नाराजी पसरली. आंबवणे, घोटवडे, कासारआंबोली, मारुंजी, जांबेमध्ये माण सारखीच परिस्थिती आहे तर नेरे, अंबडवेट, पौड, सूस, लवळे मध्ये मात्र हिंजवडीसारखा आनंद नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

आरक्षित झालेल्या गावांची आरक्षण निहाय यादी

सर्वसाधारण (खुला)

हिंजवडी, नेरे-दत्तवाडी, सुस, पौड-विठठलवाडी, अंबडवेट, भरे, लवळे, शेरे, शेडाणी-नांदिवली, जवळ-केमसेवाडी, जामगाव-दिसली, कोंढूर, मुळशी खुर्द-टाटा तलाव, माले-दत्तवाडी, बावधन बु, भुगाव, आंदेशे, वाळेण, वांद्रे-पिंपरी, भोयणी(साखरी), वडगाव, भोडे-वेडे, मुगाव (कोळोशी-गडले). खेचरे, वारक, कुळे, मुठा-मोरवाडी-भरेकरवाडी.

सर्वसाधारण स्त्री

भुकूम, आंबेगाव, नांदे, खुबवली, रावडे-हुलावळेवाडी, कोळवण-डोंगरगाव-होतले, खांबोली, बेलावडे, साठेसाई, मांदेडे, नांदगाव, हाडशी, मारणेवाडी, बोतरवाडी, माळेगाव, खारावडे, वेगरे, निवे, डावजे-कातवडी, मोसे खुर्द-धडवल-साईव खुर्द, आडमाळ, धामण ओहळ, दासवे-वडचली-पडळघर, दारवली, कोंढावळे-कळमशेत, वळणे, चिंचवड.

नागरीकांचा मागास प्रवर्ग

कासारआंबोली, मारुंजी, कातरखडक-आंधळे, रिहे-पडळघरवाडी, मुलखेड, लव्हार्डे, आंदगाव, टेमघर, चाले-सावरगाव-करमेाळी, बार्पे, चिखलगाव, वांजळे, भालगुडी.

नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री

माण-भोईरवाडी, घोटवडे-भेगडेवाडी-आमलेवाडी-मातेरेवाडी-गोंडाबेवाडी, आंबवणे (माजगाव, सालतर, पेठ शहापुर, देवघर, विसाखर, कोळवली), म्हांळुगे, पिंपळोली, अकोले, नाणेगाव, मुगावडे, असदे, जातेडे, पोमगाव, पाथरशेत-पळसे-बेंबटमाळ-चिखली, तव.

अनुसुचित जाती

उरावडे, दखणे, काशिंग-शिंदेवाडी, भादस बु,गावडेवाडी-शिळेश्वर, चांदे.

अनुसुचित जाती स्त्री

कासारसाई, जांबे, पिरंगुट-मुकाईवाडी, चांदिवली-शिरवली, वातुंडे, भांबर्डे-घुटके-आडगाव-तैलबैल-एकोले.

अनुसुचित जमाती

कुंभेरी, संभवे.

अनुसुचित जमाती स्त्री

कोळवडे, ताम्हिणी.

यंदा निवडणूकीला पॅटर्न पक्षांतर बंदीचा

            स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिली पायरी असलेली ग्रामपंचायत निवडणूक विशेष गाजत असते. मोठी तयारी आणि पराकाष्टा या निवडणुकीसाठी केली जाते. त्यात एकदा निवडून आल्यावर सरपंचपदासाठी मोठी घोडेबाजी अनेकदा पहायला मिळते. त्यात समोरच्या पॅनलचे सदस्य पळवून ऐन निवडणूकीला सरपंचपदाची बाजी पलटवली जाते. हे चित्र मात्र यंदा बदलणार असून पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार आहे. ज्या पॅनलमधून निवडून आला त्या पॅनलचा व्हिप प्रत्येक पॅनलच्या सदस्याला बंधनकारक असणार आहे.

            त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी असलेले डावपेच मात्र पुर्वीसारखे दिसणार नाहीत. पॅनलच्या उमेदवारांना पॅनलचा व्हिप मानणे बंधनकारक असल्याने ज्यांचे सदस्य जास्त निवडून येतील त्यांना सरपंचपदाची माळ घालायला मिळणार आहे. आणि यामध्ये पॅनलच्या युत्या व आघाड्या पण पहायला मिळू शकतात.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here