पदवीधर व शिक्षक मतदानासाठी मेळावा, पिचक्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी

0
1026

मुळशीत महाविकास आघाडीचा “एक साथ चलो” पॅटर्नचा नारा

विजय वरखडे, संपादक

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  महाविकास आघाडीच्या पदवीधर व शिक्षक मतदानासाठीच्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चाहूल पहायला मिळाली. मुक्ताई लॉन्स, भुकूम, ता.मुळशी येथे आज पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षानी एकत्र येत हाच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थेत राबवण्याची मागणी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. ती करताना कॉंग्रेस व शिवसेनेने हळुच कान पिचक्या काढत राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचे काम केले. तर यांवर मिश्किलपणे उत्तर देत सुळे यांनी शिवसेनेचे गोड कौतुक करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आणि एकत्र काम करण्याची पद्धत पुर्वापारपासून रुढ असल्याचे सांगितले.

            येत्या 1 डिसेंबरला पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदान होत आहे. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे अरुण लाड हे पदवीधरसाठी तर कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे शिक्षक पुणे मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मुळशी तालुक्यात महाविकास आघाडीचा मेळावा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, कात्रज डेअरी संचालक रामचंद्र ठोंबरे, राजेंद्र हगवणे, सविता दगडे, सुभाष अमराळे, शंकर मांडेकर, अंजली कांबळे, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, संतोष मोहोळ, संग्राम मोहोळ, संगिता पवळे, स्वाती ढमाले, सुनिल चांदेरे, बाळासाहेब सातव, अंकुश मोरे, राम गायकवाड, सुहास भोते, निलेश पाडाळे, संतोष तोंडे आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सरकार पडायला कारण लागते, आमचं सरकार दमदार – सुप्रिया सुळे

            यावेळी बोलताना सुळे यांनी विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवताना म्हटल्या की, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते गडबड करायला लागलेत म्हणून रोजच त्यांचे नेते हे सरकार पडणार अशी आवई उठवत असतात. मात्र सरकार पडायला कारण लागते. ते मिळत नाहीये म्हणून विरोधी पक्षाचे नेते अशी आवई उठवत असतात. व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमात राज्य सरकारवर कोणतीच टिका झालेली नसून हीच कामाची पावती आहे. पर्यटनामध्ये महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी आहे. तसेच जगाला सतावणाऱ्या कोरोनाची लस देखिल राज्यात तयार होतेय याचाच अभिमान आहे. कोविड आपत्ती वगळता राज्यात सर्वच बाबतीत सुस्थिती आहे, असं राज्य सरकारला 1 वर्ष पुर्तीच्या निमित्ताने सुळे यांनी सांगितलं.

            शिवसेनेकडे जादूची कांडी असून ती आपल्या पक्षालाही अवगत करावी लागेल असे म्हणत शिवसेनेचे सुळे यांनी कौतुक केले. शिवसेनेचा कार्यकर्ता हा पक्ष संघटन म्हणून काम करत असतो. कितीही नाराज झाला तरी तो एका फोनवर दुसऱ्या दिवशी पक्ष संघटनासाठी नाराजी दुर करून दुप्पट क्षमतेने कामाला लागतो. हेच पक्ष संघटन आवश्यक असतं. अन्यथा नाराजांची नाराजी दुर करण्यासाठी कितीतरी समजूत घालत बसावे लागते, तरीही तो शेवटी काय करेल याची शाश्वती नसते. कॉंग्रेस हा मित्र पक्ष आघाडीत नेहमीच मदत करतो त्यामुळे नवख्या शिवसेनेला सोबत घेऊन हॅप्पी एन्डिंग देखील पहायला मिळणार आहे.

            विरोधी पक्षाचे पदवीधर व शिक्षक मतदार संघात जोमाने काम चालू आहे असं नाही. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांचेच नाव मतदार यादीत नसणे ही मोठी शोकांतिका आहे. तरीही आपल्या महाविकास आघआडीने गाफील न राहता जोमाने काम करावे अशा स्पष्ट सुचना सुळे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.

            शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे म्हणाले की, येत्या काळात शिवसेनेलाही सोबत घेऊन राष्ट्रवादीने पाऊल टाकावे. झालेल्या चुका दुरूस्त करून सर्वांनाच सोबत घेऊन गेलं पाहिजे. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मातेरे यांनी हा महाविकास आघाडीचा पॅटर्न पुढील येणाऱ्या काळात असाच कायम रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            यावेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते. नानासाहेब शिंदे, अंकुश वाशिवले, नामदेव माझिरे, दीपक करंजावणे, अमित कंधारे, दत्तात्रय दहिभाते, भाऊ केदारी, जितेंद्र इंगवले, महादेव गोळे, रवि बोडके, संदिप भरतवंशी, जयवंत दहिभाते, तुषार माझिरे, बाबासाहेब पारखी, सतिश सुतार, शुभम राऊत, यशराज पारखी आदि विविध पदाधिकारी, तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुनिल चांदेरे यांनी प्रास्ताविक तर राम गायकवाड, अंकुश मोरे, निलेश पाडाळे यांनी सुत्रसंचालन केले.

आमचं Facebook Page Like करा – Click Here

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here