भोर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण यंत्रणा आणखी सक्षम करणार – ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांची ग्वाही

0
964

स्वराज्यनामा ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातल्या भोर विधानसभा मतदार संघातील विजेचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच दुर्गम, अतिदूर्गम भागासह इतर ठिकाणची वीज वितरण यंत्रणेचे जाळे आणखी विस्तारित व सक्षम केले जाईल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिली. वीज यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी पाठपुरावा केला होता.

            मुंबई येथील महावितरणच्या मुख्यालयात भोर विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न, नवीन उपकेंद्र व वीज यंत्रणेचे सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार संग्राम थोपटे, महावितरणचे संचालक दिनेश साबू, महापारेषणचे संचालक संजय ताकसांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            भोर तालुक्यामध्ये वीज वाहिन्यांची लांबी जास्त असल्याने कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र उभारणे, जीर्ण झालेले वीजखांब बदलणे आवश्यक आहे. याशिवाय अतिभारित रोहित्रांची क्षमता वाढ करण्यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीला याेजनेला गती देणे आदी मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात तसेच विजेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात असे आदेश ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी दिले. तसेच प्रलंबित कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आली.

            सध्या महावितरणचा भोर उपविभाग हा बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात आहे. मात्र वीजग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीचे असल्याने भोर उपविभाग हा पुणे परिमंडलामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डाॅ.राऊत यांनी पुणे प्रादेशिक संचालकांना दिले.

            या बैठकीला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), सचिन तालेवार (पुणे) आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भोर उपविभाग व मुळशी विभाग महावितरण व्यवस्थेतील पुढील विषयांवर महत्वपुर्ण बैठकीत मागणी केली
१) न्हावी/पेंजळवाडी उपकेंद्र प्रस्ताव मुख्य कार्यालयात मंजूरी करीता सादर केला.
२) भोर शहरा करीता स्वतंत्र उपकेंद्र.
३) महापारेषण भाटघर उपकेंद्र नुतनीकरण.
४) महापारेषण भाटघर उपकेंद्र १३२/३३ KVरोहीत बसवणे.
५) सौर उर्जा शेतीपंप डोंगर भागात कमी कार्यक्षमता प्रलंबित प्रकरणे.
६) प्रलंबित शेतीपंप व नविन शेतीपंप HVDS ऐवजी लघुदाब वाविनीवरुन देणे.
७) पावसाने पोल गंजणेचे प्रमाण मोठे.
८) २५ वर्षावरील सर्व अंदाजे ८०० पोल बदलणे.
९) भोर ग्रामिण २ व कनिष्ठ अभियंता उपविभाग रिक्त पद भरणे.
१०) तांत्रीक कर्मचा-यांची कायम पदे भरणे.
११) थकबाकी करीता बंद कनेक्शन करीता थकबाकी सवलत देणे.
१२) गावठाण ६५व शेतीपंप ६४ अधिभारीत रोहित ठिकाणी अतिरीक्त रोहीत्र बसवणे.
१३) ६३ KVA रोहीत ठिकाणी १०० KVA रोहीत बसवणे.
१४) ६३ KVA रोहित्र ठिकाणी १०० रोहित्र बसविणे.
१५) भोर शहरातील उर्वरीत वाहिन्या भुमिगत करणे .
१६) पसुरे व महुडे खो-यात पाच गावात फक्त ६० शेतीपंप ग्राहकांसाठी शेती फिडर असुन अल्पसा वापर असुनही अनावश्यक भरनियमन होते, सदर वाहिनी पसुरे वाहिनीस जोडणे.

वेल्हा-मुळशी विभागातील मागणी
१) १३२ केव्ही कामथडी EHV सबस्टेशन व १३२ केव्ही वरसगांव सबस्टेशन येथील रेहित्राची क्षमता वाढवणे, तसेच अतिरिक्त ३३ केव्ही व २२ केव्हीचे फिडर वाढवणे, तसेच कामथडी येथे महापारेषणची जागा ३३/११ केव्ही उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देणे.
२) मार्गासनी, पौड व कुंभेरी येथे नवीन ३ उपकेंद्राची स्थापना करणे व ३३/११ केव्ही पाबे उपकेंद्र व २२/११ केव्ही माले उपकेंद्र येथे अतिरिक्त रोहित्र बसवणे व अतिरिक्त फिडर वाढवणे ,पाबे उपकेंद्रासाठी अतिरिक्त ३३ केव्ही फिडर करण्यात यावा, वेळू व नसरापुर येथे नविन उपकेंद्र करण्यात यावे.
३) वेल्हा व मुळशी अतिदुर्गम व जास्त पाऊस असल्यामुळे गंजलेले पोल व उच्चदाब ५०० लघुदाब १०० तसेच नविन ५०० D.P. Distribution Box मिळावेत.
४) सौर कृषी वाहिनी योजना वेगाने कार्यान्वित करणे.
५) जुनी लाईन व तारा बदलणे.
६) मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच रिक्त असलेली पदे भरणे,सहय्यक अभियंता -नसरापूर शाखा – ०२, सहाय्यक अभियंता -पौड शाखा – ०२, तसेच तांत्रिक कर्मचारी १२० पदे रिक्त आहेत.
७) पानशेत शाखा कार्यालय नसरापूर उपविभागास जोडण्यात यावे, कारण मुळशी उपविभाग हे भरे येथे असल्यामुळे लोकांची गैरसोय होते.
८) रोहित क्षमता वाढविण्यासाठी १०० केव्हीचे – २००, ११ केव्हीचे – ५० वे २२ केव्हीचे – १०० रोहित्र देण्यात यावे.
९) लघुदाब वाहिनीला स्पेसर बसविणे.
१०) गावठाण क्षेत्राला नविन रोहित्र बसवणे.
११) नवीन फिडरची वाहिनी टाकणे
१२) ११ केव्हीची २० कि.मी. व २२ केव्हीची ५० कि.मी.वाहिनी टाकणे.
१३) ५० कि.मी.ची लघुदाब वाहिनी करणे.
१४) शेतीला नवीन फिडरची वाहिनी टाकणे, मार्गासनी, नसरापुर व वेळू.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here