क्वारंटाईन सेंटर मध्ये कोरोना रुग्णांना नेत असताना रुग्णवाहिकेचा अपघात, रुग्ण जखमी

0
1946

स्वराज्यनामा ऑनलाईन :  क्वारंटाईनसाठी कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चांदणी चौकाजवळ अपघात झाला. यामध्ये 12 – 13 रुग्ण बालेवाडी येथील क्वारंटाईनसाठी सेंटरवर नेण्यात येत होते. सर्वांना मार लागला असून त्यांना पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

              मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका खाजगी रुग्णालयाची रुग्णवाहिका (क्र.एम एच १२, सी टी ९९०३) काही रुग्णांना क्वारंटाईनसाठी बालेवाडी येथील सेंटरला घेऊन चालली होती. चांदणी चौकाजवळ बावधन हद्दीत हॉटेल शिवप्रसादच्या समोर या रुग्णवाहिकेने ताबा गमावत एका गाडीला मागून धडक देत पलटी झाली. या रुग्णवाहिकेचा चालक दारू पिला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

               घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक किरण दगडे यांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली. त्यांच्यासोबत नगरसेवक अमोल बालवडकर हेदेखील घटनास्थळी आले. नगरसेवक दगडे यांनी जखमींना दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना २ पीपीई किट दिले. जखमींना लवळे येथील सिंबॉयसिस रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली आहे. तर हे रुग्ण किष्किंदानगर, जयभवानी परिसरातील असून ते मूळ मुळशीतील भादस व परिसरातील आहेत. दरम्यान हे रुग्ण कोरोनाबधित असल्याची माहिती मिळाली आहे.

स्वराज्यनामाचे Facebook Page लाईक करा.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here