मुलाच्या हातून वडिलांचा खून, मुळशीतली घटना

0
4079

स्वराज्यनामा ऑनलाईन : माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुळशी तालुक्यात घडली आहे. मुलाने वडिलांच्या डोक्यात बॅट घालून खून केला व मृतदेह शेतात जाळून टाकला. पौडजवळील सुर्वेवाडी, ता.मुळशी येथे ही घटना घडली.

            नामदेव नथू सुर्वे (वय.७०) यांचा मुलगा मारूती नामदेव सुर्वे (वय.३५) याने खून केला आहे. घरात किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे. त्या वादाचे अवसान खुनात होण्यात झाले आहे. मंगळवार दि.५ रोजी रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. मयत नामदेव, आरोपी मारूती व मारूतीचा लहान मुलगा असे घरात तिघेच राहत होते. नामदेव यांच्या खुनानंतर त्यांचा मृतदेह आरोपीने घरासमोरील ओढ्यात नेऊन जाळून टाकला.

            त्यानंतर आज स्वतःच आरोपीने पौड पोलीस स्टेशनला येऊन गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलिस नाईक संदीप सकपाळ, पोलिस हवालदार सतीश मगर, मयूर निंबाळकर, सुनिल कदम, पोलिस पाटील प्रकाश बलकवडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी नामदेव सुर्वे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पोलिसांना दिसला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here