घोटवडेतील शिवराय फाऊंडेशनच्या अन्नछत्रातून ३०० गरजूंची सोय

0
679

स्वराज्यनामा  ऑनलाईन  : घोटवडे, ता.मुळशी येथील शिवराय फाऊंडेशनच्या वतीने दररोज घोटवडे गाव व परिसरातील ३०० गरजूंकरिता मोफत अन्नछत्र सुरू आहे. गेल्या २० दिवसांपासुन हे अन्नछत्र सुरू झाले असन परिसरातील गरजूंची सोय यातून झाली आहे.

            या अन्नछत्राचे औपचारिक वितरण करण्यासाठी मुळशी तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, सरपंच निलेश गोडांबे, मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड, गाव कामगार तलाठी स्नेहल दिवटे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशिलकर, ग्रामपंचायत सदस्य अभिजित वायकर, प्रदिप गोडांबे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत धुमाळ, बाळासाहेब गोडांबे, साहेबराव भेगडे, पोलिस पाटिल दिपक मातेरे, अर्चना गोडांबे, सविता अमराळे, सुनिल माकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस पाटलांनी शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

            सदर अन्नछत्र चालु करण्याकरिता मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर दादाराम मांडेकर, सुहास भोते, भिमराव केसवड, माजी सैनिक रवि धुमाळ, किरण किसन शेळके, हनुमंत मातेरे, राम बोंद्रे, संतोष ढोरे तसेच परिसरातील नागरिकांनी शक्य होईल ती मदत केली आहे.

            शिवराय फाऊंडेशन च्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराय फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल ओझरकर, सचिव चंद्रकांत लामखडे, सदस्य सागर जयवंत मातेरे हे विशेष परिश्रम घेत आहेत. या अन्नछत्र उपक्रमासाठी जय सुचंद्रिका मंगल कार्यालय काळुराम मुरकुटे यांनी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. या उपक्रमाचे तहसिलदार चव्हाण यांनी कौतुक केले आहे व शक्य होईल ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

            हे अन्नछत्र लाॅकडाऊन संपेपर्यंत चालु ठेवण्यात येणार असुन गरज भासल्यास त्यानंतरही चालु ठेवण्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी केले व शिवराय फाऊंडेशनचे सचिव चंद्रकांत लामखडे यांनी आभार मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here