पोलिस, प्रशासन व नागरीकांसाठी भुगावकरांकडून पौडमध्ये निर्जंतुकीकरण कक्ष

0
364

स्वराज्यनामा  ऑनलाईन  :  ऊन नाही अन तहान नाही, मात्र जिवाची व अंगाची लाही लाही होत असतानाही सर्वत्र पहारा देणार्या पोलिस बांधवांना सलामच म्हणावा लागेल. त्यांना हा सलाम करताना मुळशीतील जनसेवा फाउंडेशन-भूगाव, श्रीराम रक्षक सिक्युरिटी तसेच तंटामुक्ती समिती-भूगाव यांच्यावतीने या पोलिसरुपी देवदुतांकरिता पौड, ता.मुळशी येथील पोलिस स्टेशन येथे निर्जंतुकीकरण कक्ष समर्पित करण्यात आला आहे. यामुळे पोलिस बांधवांना आता कोरोनापासून सुरक्षेचे कवच मिळाले आहे. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी व नागरीक यांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे.

            कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पर्यंत व कुटुंबापर्यंत येऊ नये यासाठी स्वतःचा बचाव प्रत्येकजण करत आहे. मात्र पोलिस बांधव स्वतःसह कुटूंबाताही जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. अख्खा देश घरात बसला असताना डॉक्टर या देवदूतांसहित पोलिस बांधव मात्र रस्त्यांवर जागता पहारा देत आहेत. त्यांचं हे ऋण जाणून सामाजिक बांधिलकी म्हणून जनसेवा फाउंडेशन भूगाव, श्रीराम रक्षक सिक्युरिटी तसेच तंटामुक्ती समिती भूगाव यांच्यावतीने या देवदुतास निर्जंतुकीकरण कक्ष समर्पित करण्यात आला. हा निर्जंतुकीकरण कक्ष इंडिया परफेक्ट पेस्ट कंट्रोल यांच्याकडून बनविण्यात आला आहे.  

            या कक्षाचे लोकार्पण सर्व शासकीय अधिकारी, पोलिस तसेच नागरिकांसाठी करण्यात आले असून तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी कौतुक करून आभार मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here