महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
541

महाराष्ट्रातील नागरीकांच्या धैर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक, कोरोनाची साखळी तोडायचा निर्धार

स्वराज्यनामा  ऑनलाईन  :  कोरोना महाभयंकर जैविक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत कायम ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली. महाराष्ट्रातील जनता मोठ्या धैर्याने या संकटाला सामोरी गेले असून जग या संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्रातील हे धैर्य जगाला आणि देशालाही नवी दिशा दाखवणारं ठरणार असल्याची कौतुकाची थाप ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

            माणसं माणसांच्या संपर्कात आल्याने कोरोना या जैविक विषाणूचा प्रसार होत असल्याने माणसांनी कोणाच्याही संपर्कात येवू नये यासाठी जगभरात लॉकडाऊन हा पर्याय स्विकारला जात आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशातही लॉकडाऊन अंमलात आणणे तसे कठिण, मात्र यालाही येथील व्यवस्था आणि देशाप्रती असलेला आदर या लॉकडाऊनला यशस्वी होण्यात मदत करत आहेत. हे लॉकडाऊन आणखीन कधीपर्यंत वाढवले जाऊ शकते हे सांगणं आता लगेच शक्य नसलं तरी ही जैविक आजाराची साखळी तोडणं फार महत्वाचं असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यत असलेला लॉकडाऊन यापुढेही ३० एप्रिल पर्यंत कायम ठेवला असून तो आणखीन कडकरित्या अंमलात आणणार असल्याचे सुतोवाच ठाकरे यांनी दिले आहे.

            तथापि जनतेनेही आता या धैर्याने या सर्व अनपेक्षित गोष्टिंना सामोरे जावे. शासकीय सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. वेळोवेळी हात धुणे, मास्कचा वापर करणे, खोकताना-शिंकताना टीश्यू पेपर किंवा रूमाल जवळ ठेवणे, मास्क व त्या रूमालाला निर्जंतूक करणे किंवा मास्कला योग्यरीत्या जाळून टाकणे. चेहरा, डोळा व तोंड याला हात निर्जंतूक झाल्याशिवाय स्पर्शच करू नये आणि घराबाहेर गरज नाही त्यांनी जाऊच नये या गोष्टी अंमलात आणणे गरजेचे आहे.

स्वराज्यनामा’ने ही महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावा याबाबत घेतले होते सर्वेक्षण

            महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावा का असा वाचकांना प्रश्न विचारला होता. यावर ८६ टक्के वाचकांनी हा लॉकडाऊन वाढवावा असे मत नोंदवले होते. तर केवळ १४ टक्के लोकांनी यांस नकारार्थी अर्थात लॉकडाऊन वाढवू नये असे मत नोंदवले होते.

            स्वराज्यनामा हे ऑनलाईन न्यूज पोर्टल आहे. हे अचूक आणि योग्य विश्लेषणात्मक बातम्या देणारं एक सामाजिक न्यूज पोर्टल आहे. कोणत्याही व्यावसायिक हेतूशिवाय चालवलं जाणारं न्यूज पोर्टल असून वाचकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. त्यामुळेच वाचकांचे मत तपासून घेणं व त्यातून कल जाणून घेणं हे काम स्वराज्यनामाने केले. कोरोना नक्कीच जाईल, पण सर्व नागरीकांनी जास्तीत जास्त काळजी घेवून निर्धाराने त्याला हरवायला तयार राहिलं पाहिजे, असं स्वराज्यनामा तर्फे आवाहन करण्यात आलं आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here