ताम्हिणी वनक्षेत्र पर्यटनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रूपयांची मदत

0
754

तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपूर्त करताना वनक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे

स्वराज्यनामा  ऑनलाईन  :  मुळशी तालुक्यातील ताम्हिणी वनक्षेत्रातील पर्यटनातून प्राप्त झालेल्या निधीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० हजार रूपयांची मदत करण्यात आली. तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे ताम्हिणी वनक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे यांनी धनादेश सुपुर्त केला आहे.

            कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने शासनास मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची आवश्यकता असल्याची बाब समोर आली. याचाच विचार करून ताम्हिणी अभयारण्यात आलेले पर्यटक तसेच काही जणांकडून दंड म्हणून जमा करण्यात आलेली रकमेतील काही भाग मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यात आला असल्याची माहिती अंकिता तरडे यांनी दिली आहे. यावेळी तहसिलदार अभय चव्हाण, पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, ताम्हिणी वनक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे, वनपाल व्ही.व्ही. शिंदे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here