कोरोनाला हरवण्यासाठी मुळशीकरांचा आता “जनता कर्फ्यू पॅटर्न”

0
1963

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  होय, मुळशीकर नागरीक आता कोरोनाला हरवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत…. अं… हं… तर घरात बसले आहेत. रस्त्यावर उतरून समस्येला नेहमी वाचा फोडण्यात येते, मात्र घरात बसून समस्येवर उपाय केला जातो हे कोरोना या महाभयंकर संकटाने माणसाला शिकवून दिले आहे. रस्त्यावर उतरणे हा वाक्प्रचार आरपारच्या लढाईसाठी वापरला जातो, मात्र घरात बसूनही ही आरपारची लढाई जिंकता येणार, ही नवलाईच आहे. त्यासाठीच “जनता कर्फ्यू पॅटर्न” हा स्वेच्छेने मुळशीकरांनी पुढील ३ दिवसांसाठी स्विकारला आहे. यात मुळशीकर नागरिक १०० टक्के प्रतिसाद देणार आहेत.

११ एप्रिल ते १३ एप्रिल या ३ दिवसांत मुळशीत काय काय अंमलबजावणी होणार आहे ?

            आज शुक्रवार दि.१० एप्रिल रात्री १२ वाजल्यापासून भुगाव, भुकूम, पिरंगुट, घोटवडे फाटा परिसर, उरवडे, कासार-आंबोली, अंबडवेट, पौड तसेच आजबबाजुच्या घोटवडे या गावांमध्ये तसेच परिसरामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. हा कर्फ्यू सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच असल्याने सर्वजण आपली दुकाने बंद ठेवतील. यामधून अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल व दवाखाने फक्त वगळण्यात आलेले आहेत. बाकी दूध, भाजीपाला, किराणा हे सर्व बंद ठेवण्यात येणार आहेत. जनता कर्फ्युला नागरीकांनी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सामोरे जावे, असे आवाहन पौड पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले आहे.

            जर कोणी उल्लंघन करताना दिसल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नये जर वाहनावर फिरताना दिसला तर वाहन जप्त करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here