लवळे येथील सिम्बॉयसिस रूग्णालयात कोरोनासाठी ५०० बेड्स उपलब्ध, अधिकारी आणि महापौरांकडून पाहणी

0
949

आज मुळशी मध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  लवळे, ता.मुळशी येथील सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथे ५०० बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या रुग्णालयाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नांदापूरकर तसेच पुणे महानगरपालिका महापौर मुरलीधर मोहोळ अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

            लवळे येथील सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरसाठी कोविड१९ रुग्णालय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात महापौर व अधिकार्यांनी आज हि पाहणी केली आहे. येथील उपलब्ध सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी मेडिकल कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन, संचालक डॉ.खुशाली रात्रा, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित कारंजकर उपस्थित होते.

            आज मुळशी मध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. जो रुग्ण पुण्यामध्ये नायडू हॉस्पिटल ला पाठविलेला आहे त्याची प्रकृती चांगली व स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कारंजकर यांनी दिली आहे. पिरंगुट मध्ये लॉकडाऊन चे कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून वारंवार लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणाही नागरीकांनी घर सोडून कुठेही जाऊ नये. कोरोना आजाराची लक्षणं दिसायला १५ दिवस लागत असल्याने, काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासन पुर्ण प्रयत्नं करत असून नागरीकांनी सहकार्य करावे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here