जैन बांधवांचे दातृत्व, १० हजार अन्नधान्याची पाकीटं तसेच ५ लाखांचा धनादेश जिल्हा आपत्ती निधीस सुपुर्त

0
283

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  पुणे शहरातील जैन बांधवांच्या संघटनांनी गोरगरीबांसाठी 10 हजार अन्नधान्याच्या पाकीटांची मदत देऊ केली आहे. महावीर जयंतीच्या पवित्र दिवशी जैन समाजातील विविध दानशूर व्यक्तींची संस्था असणाऱ्या जितो, पुणे चॅप्टर या संघटनेतर्फे पुणे जिल्हयातील दूर्गम भागातील कातकरी बांधव, तसेच विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय कामगार किंवा व्यक्ती, त्याचप्रमाणे समाजातील दूर्बल घटकांसाठी ही मदत देण्यात आली आहे. तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी पुणे या निधी करिता ५ लाख रुपयाचा धनादेशही सुपुर्त करण्यात आला आहे.

          जैन समाज हा जगाच्या पाठीवर विविध व्यवसायांमध्ये अग्रेसर आहे. तसेच त्यांचे दातृत्वाबाबतही तो सुप्रसिध्द आहे. समाजावर जेव्हा जेव्हा मोठ मोठे अडचणीचे प्रसंग आले त्यावेळी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीसाठी धावून जाणाऱ्या सगळयांमध्ये जैन समाज कायमच अग्रेसर राहिलेला आहे. भगवान महावीरांच्या शिकवणीचा वारसा पुढे जपत समाजातील वंचित घटकांसाठी जितो, पुणे चॅप्टर या संघटनेने केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जितो, पुणे चॅप्टर संघटनेच्या कार्यापासून सर्व समाज संघटनांनी बोध घेण्याची आवश्यकता आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here