मुळशीत बेलावडेतील आदिवासी व पौडमधील मजूर कुटूंबांना किराणा व धान्याचे वाटप

0
694

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट-पुणे अध्यक्ष अशोक गोडसे यांचा पुढाकार

स्वराज्यनामा  ऑनलाईन  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना माणुसकीचा झरा मात्र वाहत असल्याचे सुखद चित्र पहायला मिळत आहे. सर्वत्र लॉकडाऊन मुळे मजूर वर्गाबरोबरच आदिवासी कुटूंबांना त्याची मोठी झळ बसली आहे. अन्नधान्यावीना त्यांची वाताहत झालेली दिसत आहे. मुळशी तालुक्यातील बेलावडे गावातील ३० आदिवासी कुटूंबांना तसेच पौड येथील १० मजूर कुटूंबांना किराणा तसेच धान्याचे वाटप करण्यात आले.

            श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट-पुणे, श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर संस्थान-पौड व काची प्रतिष्ठान-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे वाटप करण्यात आले. बेलावडे ता.मुळशी येथील आदिवासी वस्ती मध्ये ३० आदिवासी कुटूंब व पौड येथील १० मजूर कुटूंबांना याचा लाभ मिळाला.

            श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट-पुणे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ही मदत गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी पौडमधील विशाल राऊत, प्रमोद शेलार, आशिष जोशी आणि मंदार दोशी तसेच सागर लोणकर, अमेय घवी, महेश सुर्यवंशी, लोढा सर या पुण्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला व वाटप केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here