ते २ जण कोरोना निगेटीव्ह, पिरंगुटकरांसह मुळशीकरांना दिलासा

0
3264

पिरंगुट, ता.मुळशी येथे कोरोनाबाधित पेशंट आढळल्याने गाव क्वारंटाईन केल्याने ओस पडले.

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशीतील पिरंगुट गावातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील २ जणांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. परवा शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी येथील एका महिलेला न्युमोनिया सदृश्य आजार बळावल्याने तिची कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडून परिसरातील नागरीकांमध्ये खळबळ माजली होती. मात्र आता त्यात थोडासा दिलासा मिळाला आहे.
            मुळशी तालुका आरोग्य अधिकारी करंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कोरोना बाधित महिलेचा पती आणि महिलेस उपचारासाठी नेणारी एक व्यक्ती अशा दोघांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ती निगेटीव्ह निघाली आहे. तसेच त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्यात येत असून १५ लोकांना क्वारंटाईनही केले आहे.
            मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी सांगितले की, पिरंगुटमध्ये कोरोना बाधित महिला पेशंट निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण पिरंगुट गाव पुर्णपणे बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस पिरंगट असेच राहणार आहे. आणि पिरंगुट गावातील प्रत्येक नागरीकाचा सर्व्हे चालू असून प्रत्येकाच्या आरोग्यावर बारकाईने नजर ठेवणार आहे. कोणाला ताप आला असेल तर त्याच्याबद्दल दक्षता घेतली जाईल. तसेच कोणाही नागरीकांस ताप, खोकला, घशाला इन्फेक्शन असे काही जाणवत असेल तर त्यांनी घाबरून न जाता प्रशासनास कळवावे. त्याला योग्य मार्गदर्शन व लागलीच आरोग्य सेवा देता येईल.
            नागरीकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणताही चूकीचा संदेश सोशल मिडीयावर पसरवू नये. असे आवाहन मुळशी तालुका पत्रकार संघातर्फे समस्त मुळशीकरांना करण्यात आले आहे. चुकीचे मेसेज पसरणार्यांवर गुन्हे दाखल होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here