बावधन येथे मजूरांना किराणाचे वाटप, कोरोना प्रतिबंध आढावा बैठकही संपन्न

0
389

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  बावधन, ता.मुळशी येथे मजूरांना जीवनावश्यक वस्तूंच्या एक हजार किटचे वाटप करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक शांतीलाल मुथा व बावधनचे माजी आदर्श सरपंच निलेश दगडे आणि मुळशी तालुका युवक कॉंग्रेसच्या प्रयत्नांतून व आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनातून हे वाटप करण्यात आले आहे. मजूरांच्या 15 दिवसांची सोय मात्र यातून भागली आहे.

         यावेळी आमदार संग्राम थोपटे, मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, हिंजवडी पोलीस निरीक्षक गवारी, उद्योजक राजेंद्र बांदल, वातुंडे सरपंच अमोल शिंदे, बावधन उपसरपंच बापु दगडे, गणेश दगडे, मधुर दाभाडे आदी उपस्थित होते.

मुळशीत कोरोना प्रतिबंधासाठी बावधन, ता.मुळशी येथे आढावा बैठक संपन्न

         कोरोना रोगामुळे तालुक्यातील सद्यस्थिती कशाप्रकारे आहे, तसेच त्यासंबधी काही प्रश्न कसे सोडवले गेले पाहिजेत या सर्व बाबींवर आज बावधन येथे आमदार संग्राम थोपटे, मावळ-मुळशी प्रांत अधिकारी संदेश शिर्के, मुळशी तहसिलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, पौड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here