काशिगमध्ये शिवजयंती निमित्त किर्तनाचे आयोजन; वारकऱ्यांना २०० तुळशीरोपांचे वाटप

0
271

काशिग, ता. मुळशी येथे शिवजयंती व तुकाराम बीजनिमित्त किर्तन सेवा करताना हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर.

स्वराज्यनामा ऑनलाईन  : शिवजयंती व तुकाराम बीजेनिमित्त काशिग, ता.मुळशी येथे सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. ग्रामविकास आघाडी, काशिग यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तसेच तुकाराम बीजेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात २०० वारकऱ्यांना तुळशीचे रोपांचेही वाटप करण्यात आले.

            यावेळी बाळासाहेब चांदेरे, श्रीकांत कदम, प्रकाश भेगडे, तुकाराम टेमघरे, सुनील चांदेरे, गंगाराम मातेरे, भानुदास पानसरे, संगिता पवळे, कोमल वाशिवले, अविनाश बलकवडे, समीर जाधव, अंकुश सोनवणे, यशवंत गायकवाड, माऊली साठे, पोपट दुडे तसेच तालुक्यातील प्रमुख मान्यवर तसेच वारकरी सांप्रदाय बहुसंख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे आयोजन शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, काशिग गाव तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नवनाथ टेमघरे, युवासेना उपतालुकाधिकारी नामदेव तिडके, आर.पी.आय.युवानेते राहुल कदम, दत्ता शिंदे, नितीन बारमुख, सचिन टेमघरे, विष्णू टेमघरे, किसन टेमघरे, मारुती डफळ यांनी केले होते. यावेळी संतसेवा भजनी मंडळ तसेच काशिग ग्रामस्थांचे विशेष सहकार्य मिळाले.

            तुळशीमुळे आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते, तसेच तुळशीपत्रांचा बर्‍याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो. म्हणुन तुळशीची रोपे वाटल्याचे शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here