मुठा, ता.मुळशी येथे कर्जमाफी संदर्भात सभासदांची आधार कार्ड प्रमाणीकरण सुरू असताना.
स्वराज्यनामा ऑनलाईन : मुठा, ता.मुळशी येथील अमृतेश्वर कार्यकारी विकास सोसायटीच्या वतीने कर्जमाफी संदर्भात सभासदांची आधार कार्ड प्रमाणीकरण सुरू केले आहे. दुसर्या टप्प्यातील कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू केली असल्याचे चेअरमन चंद्रकांत कुडले यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन कुडले, उपसंरपंच विजय मोहोळ, शाखा व्यवस्थापक बाळासाहेब ववले, विकास आधिकारी अजय केदारी, लिपिक अर्जुन ढोरे, लेखापाल सुरेश काळोखे, सचिव मल्हारी मोहोळ, सचिव आंनद कुडले, सहाय्यक अकुंश तिकोणे हे उपस्थित होते. ते शासनाच्या वतीने कर्जमुक्तीचे काम पाहत आहेत. सदर सोसायटीतील २१४ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.