भुगाव, भुकूम व बावधन या गावांसाठी मुळशी प्रादेशिक योजनेची मंत्रालयात मागणी

0
877

मंत्रालय, मुंबई : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देताना ग्रामस्थं व पदाधिकारी.

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  भुगाव, भुकूम व बावधन या गावांना मुळशी प्रादेशिक योजनेचा लाभ मिळावा यासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. आमदार संग्राम थोपटे, नेते राजाभाऊ हगवणे व भूगाव सरपंच निकीता सणस यांच्यासह भुगाव, बावधन, भुकूम मधील ग्रामस्थं, ग्रामपंचायत सदस्य यांनी हे निवेदन दिले आहे. नागरिकीकरण वाढल्यामुळे या शहरी बहुल भागात सध्या पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल आहेत. त्यामुळे त्वरित यावर तोडगा निघणे आवश्यक आहे.

            मुळशी प्रादेशिक योजना टप्पा क्र.२ मधून नळ पाणी पुरवठा योजना या गावांमध्ये करण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मा नामदार गुलाबराव पाटील साहेब पाणी पुरवठा मंत्री यांच्या बरोबर आमदार संग्राम थोपटे यांच्यासह जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता, पुणे यांच्या बरोबर बैठक घेण्यात आली. या वेळी कार्यकारी अभियंता साहेब यांनी सांगितले की, सध्या भुगाव करता पाण्याचा मंजुर झालेल्या योजनेचा श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय येथील उदभव पुरेसा नसल्यामुळे सदरची मंजुर रद्द करण्याची गरज आहे. मुळशी प्रादेशिक टप्पा क्र.२ योजने अंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजना भुगाव, भुकूम आणि बावधन या गावासाठी करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी थोपटे यांनी दिवाळीत ऑक्टोंबर २०२० मध्ये योजनेच्या कामासाठी प्रारंभ करण्यात यावा असे मंत्री साहेब यांना विनंती केली

            यावेळी मा मंत्री साहेब यांनी कार्यकारी अभियंता, पुणे यांना दोन महिन्यात सर्वेक्षण करून योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा असे आदेश दिले. यावेळी राजाभाऊ हगवणे, हरिभाऊ चोंधे, राहुल शेडगे, स्वस्तिकदादा चोंधे, गोंविद  मिरघे, मदन माझिरे, विजय माझिरे, निलेश दगडे, गोंविद आंग्रे, कुणाला भरतवंशी, कालिदास शेडगे, रमेश सणस, तुषार माझिरे, मयुर कांबळे, अर्चना सुर्वे, शेलार भाऊ साहेब, बोराटे भाऊसाहेब आदि यावेळी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here