पेरिविंकल स्कूलमधून एक तरी नक्की शास्त्रज्ञ व्हावा – डॉ.रघुनाथ माशेलकर

0
503

बावधन व पिरंगुट शाखांची सायन्स पार्क व आयुकाला भेट तर सुस व पौड शाखांमध्ये विज्ञान प्रदर्शन

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  पेरिविंकल स्कूलमधून एक तरी नक्की शास्त्रज्ञ व्हावा, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 28 फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिनानिमित्त पेरिविंकल स्कूलच्या बावधन व पिरंगुट शाळेतील विद्यार्थ्यांनी औंध येथील आयुका व पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्कला भेट दिली. त्यावेळी डॉ.रघुनाथ माशेलकर यांची सर्व शिक्षकांनी भेट घेतली, तेव्हा त्यांनी आशा व्यक्त केली.

            चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बावधन, पिरंगुट, पौड व सूस या चारही शाखांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२० रोजी विविध उपक्रम राबवण्यात आले. सर्व उपक्रमात विविधता आढळून आल्याने एक आगळा वेगळा विज्ञान दिन साजरा झाला. बावधन व पिरंगुट शाखेच्या विद्यार्थ्यांनी औंध येथील आयुका व पिंपरी  चिंचवड येथील सायन्स पार्कला भेट दिली. तेथील विविध विज्ञानाचे अविष्कार बघितले. अनेक यंत्रांच्या प्रतिकृती बघून विद्यार्थ्यांचे डोळे दिपून गेले.

            पहिले वाफेचे इंजिन, पहिली मोटर कार, पहिली सायकल, चाकाचा शोध कोणी कुठे कधी व कसा लावला याचे प्रात्यक्षिक, तारांगण असे एकापेक्षा एक प्रकल्प बघून विद्यार्थी भारावून गेले व यातीलच दुग्धशर्करा योग म्हणजे विज्ञान केंद्रात थोर शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांचयाशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता आला. आजच्या पिढीला थोर शास्त्रज्ञांचे दर्शन हाच मुळी सुवर्णयोग आहे. त्यामुळे आयुष्यभर लक्षात राहील अशी एक आगळी वेगळी विज्ञान केंद्राला भेट सुफल संपूर्ण झाली. यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल तसेच संचालिका रेखा बांदल यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभल्याने विद्यार्थ्यांना हा दुर्मिळ योग अनुभवणे शक्य झाले. यावेळी बावधन शाखेचे 400 विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या समवेत  बावधन शाखेच्या पर्यवेक्षिका सौं निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तर पिरंगुट शाखेच्या 100 विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक अभिजित टकले, पर्यवेक्षिका पूनम पांढरे व शिक्षकवृंद याच्या समवेत विज्ञान केंद्रास भेट दिली. 

            पौड व सुस शाखांमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुनिल चांदेरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, शाळेच्या संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल,मुख्याध्यापिका सौ.स्वाती पवार मॅडम, कार्यवाहिका वर्षा गुल्हाने, शिल्पा क्षिरसागर, दीपाली सोनावणे आदी उपस्थित होते.

            पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये प्रत्येक वर्षी एक विशिष्ट संकल्पना घेऊन राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो. यावर्षीची संकल्पना ब्रेन वल्ड ही ठेवण्यात आली होती. या वेळी बांदल सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  सांगितले की, विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत असे आवाहनही केले.

            या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त साहित्य निर्मिती, स्मार्ट व्हिलेज-स्मार्ट पार्किंग, पाणी शुद्धीकरण, दळणवळण, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण-मृदसंधारण, अंतराळामधील ग्रह व ताऱ्यांची माहिती सांगणारी आकाशगंगा, तसेच शाळेतील मुलांनी काढलेली चित्रे व हस्तकलेच्या वस्तु प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थीदशेत संशोधनाचे बीज विद्यार्थ्यांनमध्ये रोवावे,  या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

            या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पौड शाखेच्या पर्यवेक्षिका दीपाली सोनावणे,  सुस शाखेच्या मुख्याध्यापिका स्वाती पवार मँडम, पर्यवेक्षिका वर्षा गुल्हाने, शिल्पा क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयोगाने करण्यात आले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here