मुळशीत महाशिवरात्रीचा जागर, किर्तन, पालखी सोहळ्यास भाविकांची गर्दी

0
525

पौड, ता.मुळशी येथील श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त केलेली आकर्षक सजावट

स्वराज्यनामा ऑनलाईन  :   मुळशी तालुक्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा जागर करण्यात आला. मोठ्या उत्साहात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत भाविकांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला.

            पौड, ता.मुळशी येथे श्री मल्लिकार्जुन महादेवाचा उत्सव साजरा करण्यात आला. येथील मंदिराला मोठी विद्युत रोषणाई केली होती. अभिषेक, पालखी मिरवणूक, किर्तन, विद्यूत रोषणाई, नैवेद्य आणि भाविकांना अन्नप्रसाद आदि कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामदैवत दिगंबरनाथ मंदिर येथे पालखी व पादुकांचे पूजन करून पालखीने प्रस्थान केले.

            श्री मल्लिकार्जुन मंदिरातील गाभाऱ्यात फुलांची खुपच आकर्षक अशी सजावट केली होती. येथील विश्वस्त मंदार दोषी व संस्थानच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली होती. पौड व परिसरातील नागरीकांची दर्शनासाठी रांग लागली होती. मुगावडे, ता.मुळशी येथील युवा किर्तनकार नवनाथमहाराज माझिरे यांचे किर्तन संपन्न झाले.

            भुकूम, ता.मुळशी येथील श्री रामेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट केली होती. श्री रामेश्वर महादेव मंदिराचे ऐतिहासिक महत्व आहे. ग्रामस्थांनी महाआरतीचे आयोजन केले होते. रात्री ह.भ.प.राजेंद्र महाराज दहिभाते यांच्या सुश्राव्य किर्तनास नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

            अंबडवेट, ता.मुळशी येथील पांडवकालीन महादेव मंदिरास आकर्षक रंगरंगोटी करून विद्यूत रोषणाईने सजवण्यात आले होते. अंबडवेट व परिसरातील कंपन्यांमधील कामगार दर्शनासाठी सकाळपासूनच येत होते. पांडवांच्या काळात या मंदिराची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर मंदिराचा जिर्णोध्दार ४० वर्षापुर्वी झाला असल्याचे मंदिराच्या ठिकाणी नमूद केले आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here