छत्रपती शिवाजी महाराजांची सवारी, बुलेटवर शोभतेय भारी…

0
939

स्वराज्यनामा ऑनलाईन : काय म्हणता…? शिवरायांची मुर्ती… ती पण चक्क बुलेटवर….? होय… एक अनोखा शिवभक्त मावळा काल हिंजवडी परिसरात पहायला मिळाला. चक्क बुलेटवर शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून वर भगवा झेंडा फडकवत यांची सवारी हिंजवडी, पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या दिमाखात फिरत होती. आजुबाजूला असणाऱ्या सर्वच लोकांचे लक्ष वेधून घेत होती.
            मुळ कोल्हापूरचे असलेले बंडू पाटील हे निवृत्त लष्कर अधिकारी आहेत. गेली ५-६ वर्ष ते हा उपक्रम करत आहेत. महाराजांची मुर्ती बुलेट गाडीवर स्थापन करायची आणि भक्तिभावे पुजा अर्चा करून सवारी करत ठिकठिकाणच्या शिवजयंतीला उपस्थिती लावायची. त्यामुळे त्यांची उपस्थिती आबालवृद्धांना आकर्षित करून घेणारी व सर्वांना आनंदीत करणारी ठरत आहे.
            ३० वर्ष आर्मी मध्ये सेवा केल्याचं बंडू पाटील यांनी स्वराज्यनामाशी बोलताना सांगितलं. आर्मी मेडिकल कोअरमध्ये सुभेदार पदावर काम केलं आहे. जम्मू-कारगिल युद्धात ६ वर्ष, लखनऊ मध्ये १५ वर्ष, वानवडी एएफएमसी, झांशी, राजौरी, पुंछ अशा भागात त्यांनी आर्मीची सेवा बजावली आहे. ती बजावत असताना त्यांनी आपल्या पोस्टींगच्या तिथे गणेशपुजा करण्यास सुरवात केली व त्याची गोडी सर्वांना लावली. महाराष्ट्र व्यतिरिक्त राज्यातील जवानांना लेझिमही शिकवले असल्याचे त्यांनी सांगितले.
            बंडू पाटील हे २०१४-१५ वर्षी निवृत्ती नंतर कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात स्वतःच्या बुलेटवर जिचं कॅरियर मजबूत आहे तिच्यावर एक झाड लावणार आहेत आणि वृक्षलागवडीचा संदेश लिहून सर्वांना प्रेरणा देणार असल्याचं मत त्यांनी मांडलय. त्यांच्या या कार्यामुळे नक्कीच नागरीकांना वृक्षलागवडीचं महत्वं पटून त्याची अंमलबजावणी करायला भाग पाडेल, यात शंका नाही.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here