श्री संत तुकाराम कारखाना निवडणूकीत माजी खासदार नवले यांच्या शेतकरी पॅनेलचेच वर्चस्व

0
994

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत माजी खासदार विदूरा उर्फ नानासाहेब नवले यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचवार्षिक निवडणूकीत या  कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या विदूरा नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने बहुमत मिळवले आहे.

            मुळशीच्या हिंजवडी-ताथवडे गटात पांडूरंग राक्षे यांनी शेतकरी पॅनलला पाठींबा दिला होता, त्यामुळे निकाल जवळपास निश्चितच झाला होता. या गटात विदूरा नवले यांना ९९७४, बाळासाहेब बावकर ९४२१ आणि तुकाराम विनोदे ९०९० मते मिळवून विजयी झाले. ७१५ मते या गटात बाद झाली आहेत.

            पौड-पिरंगुट गटात मात्र चुरस पहायला मिळत होती. या गटात दिलीप दगडे यांना  ९४०१, अंकुश उभे ९४३८ आणि महादेव दुडे ८६७९ मते मिळवत विजयश्री खेचून आणली. मात्र माजी खासदार अशोक अण्णा मोहोळ यांचे सुपुत्र संग्राम मोहोळ यांना केवळ २३३७ मतांवर समाधान मानावे लागले, ते पराभूत झाले. येथे ५८७ मते बाद झाली आहेत.

            मावळ तालुक्यातील सोमाटणे-पवनानगर गटातून नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, शामराव राक्षे हे बिनविरोध निवडून आले होते. मात्र सुरूवातीला रंगतदार वाटलेली तळेगाव-वडगाव गटातील निवडणूक मात्र एकतर्फीच झाली. या गटातील बापूसाहेब भेगडे यांना ९१९२, ज्ञानेश्वर दाभाडे ९१३१ आणि शिवाजी पवार ९१०९ हे पॅनलचे उमेदवार विजय झाले. तर त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या गेल्या पंचवार्षिकमध्ये नवले विरोधी पॅनलचे नेतृत्व केलेल्या बाळासाहेब नेवाळे यांना अवघी १४१५ मते पडली. तर पंढरीनाथ ढोरे ६३३, तुकाराम नाणेकर ८२४ यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.

            खेड-शिरूर- हवेली गटातही प्रविण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहिते, अनिल लोखंडे या पॅनलच्या उमेदवारांच्या विरोधात अरूण लिंभोरे यांची एकाकी लढत पुर्णपणे अपयशी ठरली. या गटात प्रविण काळजे ९६८७ मधुकर भोंडवे ९५१०, दिनेश मोहीते ९२३० अनिल लोखंडे ९०७३ हे विजयी झाले. तर लिंभोरे यांनी फक्त ९२१ मते मिळाली. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत नवले पॅनलच्या ताराबाई सोनवणे ८७७३, शुभांगी गायकवाड ९७८२ या विजयी झाल्या. बंडखोर रूपाली दाभाडे १४७५ या पराभूत झाल्या. येथे ६०८ मते बाद झाली.

            भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले पॅनलचे बाळकृष्ण कोळेकर ९८१५ विजयी झाले. त्यांच्या विरूद्ध बंड पुकारलेले सुरेश जाधव यांना केवळ २२५ मते पडली. पॅनलला पाठिंबा दिलेले शिवाजी कोळेकर यांना ४६१ मते पडली. येथे १०३६ मते बाद झाली. इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये पॅनलचे चेतन भुजबळ ९७४८ विजयी झाले असून त्यांच्या विरूद्धचे अरूण लिंभोरे यांना ११४३ मते मिळाली. या गटात ७१३ मते बाद झाली. अनुसूचित जाती, जमाती गटात बाळू गायकवाड ९६३४ मतं मिळवून विजयी झाले. सखाराम गायकवाड ९७२ मतांसह पराभूत झाले. येथे ७०५ मते बाद झाली.

            या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आर.एस.धोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण साकोरे, संतोष शिरसेटवार, शाहूराज हिरे, दिग्विजय राठोड, हर्षित तावरे, श्रीकांत श्रीखंडे, बी.एस.घुगे, यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. सुमारे दिडशे कर्मचारी पन्नास टेबलवर कार्यरत होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here