२० हजार स्पर्धकांमधून भुगावच्या गणेश वडीयारा विद्यार्थ्याची घनकचरा व्यवस्थापन अंतिम स्पर्धेसाठी निवड

0
491

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  राज्यस्तरीय घनकचरा व्यवस्थापन स्पर्धेत राज्यभरातील २० हजार स्पर्धकांमधून फक्त १५० प्रोजेक्टची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये भुगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माताळवाडी क्र.२ येथील गणेश वडीयारा या इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे.

            रोटरी क्लब, वनराई, स्कायशिया, स्वच्छ भारत, ज्ञान-की, ९५ बिग एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयसर, पुणे येथे झालेल्या प्रदर्शनात सहभागी होत गणेश या विद्यार्थ्याने हे यश संपादन केल्याचे त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका सविता पवार यांनी यावेळी सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन करून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात या विषयांवर दिग्गजांनी मार्गदर्शन केले.

            भुगाव येथील मानव्य संस्थेच्या सहकार्याने माताळवाडी जिल्हा परिषद शाळेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष कृती, प्रात्यक्षिकांद्वारे ज्ञानाचे दृढीकरण होईल. त्यामुळे ही प्रथम सुरवात करून समाजात ही गोष्ट नेल्यास अधिक समाजभिमुख होऊन प्रदुषण, रोगराईला आळा बसेल असे मत शिक्षिका सविता पवार यांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here