टाटा धरणग्रस्तांच्या गाव विस्तारासाठी कोमल वाशिवले यांचा पुढाकार

0
404

टाटा धरणग्रस्तांच्या गांव विस्तारासंदर्भात मुळशीच्या तहसिलदारांना निवेदन देताना कोमल वाशिवले व इतर.

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  मुळशी तालुक्यातील टाटा धरणग्रस्त गावांचा विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य कोमल वाशिवले यांनी पुढाकार घेत तहसिलदारांना निवेदन सादर केले आहे.

             सध्या धरण परिसरात कोणतेही बांधकाम करावयाचे झाल्यास ग्रामस्थांची टाटा कंपनीकडून अडवणूक केली जाते. त्यामुळे गाव विस्तारासाठी जागेची मोजणी लवकर करावी तसेच ५२ गांवे व वाड्या-वस्त्यांसाठी नक्की किती जागा टाटा कंपनीकडे मागायचे हे काम लवकरात लवकर करण्यात यावे. अशी जोरदार मागणी वाशिवले यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे केली आहे.

             टाटा धरण परिसरातील बार्पे-तिस्करी, आंबवणे, कुंभेरी, पोमगांव, शिरवली-चांदिवली, शेडाणी, वळणे, संभवे, जामगांव, माले, मुळशी, ताम्हिणी, निवे, वडगांव, वांद्रे या ग्रामपंचायती अंतर्गत ५२ गावे व वाड्या वस्त्या आहेत. या गावात बांधकांमाना टाटा कंपनीकडून अडथळे येत असतात. सदर गावाच्या गावठाण विस्तारासाठी लागणारे एकूण ५२ गावाचे ७/१२ उतारे, जाब जबाब, पंचनामे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभागाला प्राप्त झाले आहेत. मात्र गावठाण विस्तारासाठी किती क्षेत्राची आवश्यकता आहे याचा अहवाल अद्याप पर्यंत सादर झालेला नाही. यामुळेच धरणभागातील गावांचा विस्तार रखडलेला आहे.

             निवेदन देताना वळणेचे सरपंच समीर सातपुते, ग्रामपंचायत सदस्य अनिल मापारे, भरत खरूसे, राजू पाठारे, दता दिघे, आनंता सोनार, गणेश वाशिवले, पिटू मापारी उपस्थित होते.

             मुळशी धरणग्रस्त गावामध्ये बांधकाम करत असल्यास टाटा कंपनीकडून त्याची अडवणूक केली जाते. तरी मुळशीतील तहसिल विभाग व पंचायत समिती विभागाने गावठाण विस्तारासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करावी. म्हणजे गावठाण विस्तासाठी आवश्यक असलेल्या जागेची टाटा कंपनी कडे मागणी करता येईल अशी मागणी माजी सभापती कोमल वाशिवले यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here