पिरंगुट ग्रामपंचायतीकडून वंचित महिला व दिव्यांगांना बावीस लाख रुपयांचे वाटप

0
339

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  पिरंगुट, ता.मुळशी ग्रामपंचातच्यावतीने अपंग व वंचित महिलांना एकुण बावीस लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून या मदतीचे वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच प्रविण कुंभार व ग्रामविकास अधिकारी डी डी भोजने यांनी दिली. त्यांच्याच हस्ते धनादेशाचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

            यावेळी छाया पवळे, अश्विनी निकटे, रेश्मा पवळे, रामदास गोळे, तेजस्विनी उभे , ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे, विकास पवळे, महेश वाघ, लक्ष्मण निकटे, श्रीकांत केदारी, अंकुश खडके, सुरेखा पवळे, सारिका गोळे, सुवर्णा नवाळे, जनाबाई गोळे, सारिका केदारी तसेच ग्रामस्थं उपस्थित होते.

            ग्रामपंचायतीचा चौदावा वित्त आयोग उपजीविका अंतर्गत येथील पंधरा वंचित विधवा महिलांना व्यवसायांसाठी एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे हे अनुदान मिळाल्याने येथील वंचित महिलांना स्वतःचा रोजगार उभा करता येणार आहे. तसेच ५ टक्के अपंग कल्याण निधीतून येथील ३९ दिव्यांगांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रमाणे एकूण एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांचे वितरण करण्यात आल्याने या अपंगांनाही रोजगार मिळणार आहे.

            याबाबत ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे यांनी सांगितले की, गावातील अपंग व वंचित घटकांना ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शासनाच्या विविध योजना लाभार्थींपर्यंत पोचविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वंचित महिला व अपंग लाभार्थींना हा निधी मिळाला आहे. तसेच या चालू वर्षात अजुनही ४-५ बांधवांना निधी दिला जाऊ शकतो असेही पवळे यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here