स्व.चंद्रकांत शंकर राऊत स्मरणार्थ सोशल फाऊंडेशनची स्थापना व रक्तदान शिबिर

0
771

‘सीएसआर सोशल फौंडेशन’च्या रक्तदान शिबिरात रक्तदान करताना मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, समवेत कीर्तन केसरी चंद्रकांत महाराज वांजळे व मान्यवर.

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  लवळे, ता.मुळशी येथील माजी सरपंच स्व.चंद्रकांत शंकर राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ‘सीएसआर सोशल फौंडेशन’ची स्थापना करण्यात आली. स्थापना दिनाच्या निमित्ताने फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

            ‘सीएसआर सोशल फौंडेशन’चे उदघाटन तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व स्व.शंकर राऊत यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अरुणा चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराचे उदघाटन केले. या फौंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त किर्तनकेसरी चंद्रकांत महाराज वांजळे महाराज यांचे प्रवचनही झाले.

            कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय सातव व प्रास्ताविक प्रमोद राऊत यांनी केले. आभार ऋषिकेश राऊत यांनी मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here