बावधनकरांच्या सेवेत नगरसेवक किरण दगडे यांच्या प्रयत्नांतून बससेवेचा प्रारंभ

1
647

स्वराज्यनामा ऑनलाईन : बावधनकरांच्या सेवेत नवी पीएमपीएमएल सुरू करण्यात आली. नगरसेवक किरण दगडे यांच्या प्रयत्नातून ही बससेवा सुरू झाली. यामुळे बावधनकरांची मोठी सोय होणार असून यावेळी उपस्थित नागरिकांनी दगडे यांचे मोठे आभार मानले. पुणे महानगरपालिका ते बावधन असा नव्या बसचा मार्ग आहे.
              नव्या बससेवेचा पीएमपीएमएल चे अध्यक्ष शंकर पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक किरण दगडे पाटील, सरपंच पियुषा किरण दगडे पाटील, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पनाताई वरपे, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, मा.सरपंच बबनराव दगडे, पोलीस पाटील बबनराव दगडे, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, ग्रा.प.सदस्य आझाद दगडे, कल्पनाताई घुले, वैशालीताई दगडे, सचिन दगडे, धनंजय दगडे तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
              पूर्वी बावधनला असलेली बससेवा बंद पडली होती. ती आज पुनरुज्जीवित केल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. खाजगी रिक्षा शिवाय सामान्य नागरिकांना पर्याय नसल्याने त्यांचे हाल होत होते. कोथरूड व शहर भागात जाण्यासाठी भरमसाठ पैसे मोजायला लागायचे. बस सेवेमुळे या समस्यां सुटणार आहेत. नागरिकांनी सांगितल्या नुसार बसचा मार्ग ठरवण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका – कोथरुड डेपो – एलएमडी चौक – मेगमल्हार चौक – न्याती – पुराणिक अबीतांते – पाटील नगर – कोथरुड डेपो – पुणे महानगरपालिका असा हा बसचा मार्ग आहे.

ही बातमी शेअर करा :

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here