निवे, ता.मुळशी येथील आरोग्य शिबिरात २८४ जणांची तपासणी व उपचार

0
460

ग्रामपंचायत निवे व अंकुशभाऊं मोरे युवा मंच आयोजित आरोग्य शिबिरावेळी बोलताना मान्यवर

स्वराज्यनामा ऑनलाईन : चोरघे वाडी, निवे, ता.मुळशी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले. यामध्ये विविध आजाराने ग्रस्त असलेल्या २८४ लोकांची तपासणी केली. ग्रामपंचायत निवे व अंकुशभाऊं मोरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर राबवण्यात आले. शिबिरातून ९ लोकांना एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे येथे पाठवण्यात येऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

             यावेळी मुळशी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर, उपसभापती विजय केदारी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, जिल्हा परिषद सदस्य अंजलीताई कांबळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, सुनिल चांदेरे, विनोद कंधारे, कोमल वाशिवले, मुळशी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अंकुश मोरे, दीपाली कोकरे, निवे गावचे सरपंच सुनिल गाऊडसे, उपसरपंच नंदू शिंदे, बाळासाहेब झोरे, विजय येणपुरे, विजय कानगुडे, धुळाभाऊ कोकरे, निलेश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

             यांसह निवे ग्रामपंचायत सदस्य आशा चोरघे, रुपाली गोरे, शुभांगी गाऊडसे, निता गाऊडसे, सदस्य गणपत वाघमारे, ग्रामसेवक भरत शिरसाठ, गणेश निवेकर, पोलिस पाटिल शंकर मराठे, लक्ष्मण कोंढेकर, भरत गाऊडसे, दत्ता गोरे, मारुती चोरघे, यशवंत चोरघे, जयवंत चोरघे इत्यादी मान्यवर व अनेक ग्रामस्थं उपस्थित होते. ग्रामीण भागातील लोकांना म्हणाव्या तशा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, म्हणून आरोग्य शिबिर राबवून जास्तीत जास्त नागरीकांना त्याचा लाभ मिळवून देता यावा यासाठी आरोग्य शिबिर राबवल्याची माहिती अंकुश मोरे यांनी दिली.

             या सर्व रोग निदान शिबिरात एकुण २८४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ जणांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. ६० रूग्णांची डोळे तपासणी करून ३० जणांना चष्मे वाटप करण्यात आले आहे. ४५ रूग्णांची कानाची तपासणी करून २५ रूग्णांना कानाचे मशिन वाटण्यात आले. ६२ जणांची दंतचिकित्सा करून १२ जणांवर उपचार करण्यात आले. जवळपास १७८ जणांची शर्करेचे प्रमाण व रक्तदाबही तपासण्यात आला. त्यापैकी शर्करा प्रमाण जास्त असलेले १० तर उच्च रक्तदाब असलेले ४४ रूग्णं आढळले.

आरोग्य शिबिरामध्ये ग्रामस्थांनी रांगा लावून तपासणी आणि उपचार करवून घेतले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here