बालवीर युवक मंडळाने केला गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सन्मान

0
594

कै.तानाजी किसन पवळे व कै.मच्छिंद्र ज्ञानोबा पवळे यांच्या स्मरणार्थ पुरस्काराचे वितरण

स्वराज्यनामा ऑनलाईन  : पिरंगुट, ता.मुळशी येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. बालवीर युवक मंडळाच्या वतीने पिरंगुट इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

             पिरंगुट कॅम्प परिसरात असलेल्या या बालवीर युवक मंडळातर्फे कै.तानाजी किसन पवळे याच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व पिरंगुट व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्त प्रिंटिंग प्रेस अँड फ्लेक्स प्रिंटिंगचे संस्थापक कै.मच्छिंद्र ज्ञानोबा पवळे याच्या स्मारणार्थ आदर्श शिक्षक, शिक्षिका, लिपिक व सेवक पुरस्कार दिला जातो.

             यावर्षी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीतील प्रतीक सोपान सरपे, प्रशांत संतोष लांडगे, विराज संतोष गावडे, वैष्णवी गौतम नेटके, पाटील सायली भोलेश्वर पाटील, संध्या बाबासाहेब सोनावणे या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. 

             आदर्श शिक्षिका – संजना कदम, ज्योती बढे, अमृता खराडे, आदर्श शिक्षक – अनिल चिखले, अंकुश भिसे, महेश विधाते, आदर्श सेवक – दिलीप कुलकर्णी, आदर्श लिपिक – शशिकांत नलावडे यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पवार यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले.

             यावेळी सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच छाया पवळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका संगिता पवळे, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने, माजी सरपंच रमेश पवळे, सदस्य रेश्मा पवळे, अश्विनी निकटे, तेजस्विनी उभे, रामदास गोळे, जनाबाई गोळे, राहुल पवळे, महेश वाघ, विकास पवळे, प्रविण कुंभार, लक्ष्मण निकटे, अंकुश खडके, श्रीकांत केदारी, सुरेखा पवळे, सारिका गोळे, सारिका केदारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

             कार्यक्रमाचे नियोजन उमेश पवळे, विशाल पवळे व बालवीर युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. प्रास्ताविक माजी उपसरपंच रामदास पवळे यांनी केले. सूत्रसंचालन माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पवळे यांनी केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here