पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बालगंधर्व येथे चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

0
1061

संस्थापक कै.बाबूरावजी घोलप आणि सहकारमहर्षी कै.मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृती सप्ताहानिमीत्त आयोजन

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक कै.बाबूरावजी घोलप आणि सहकारमहर्षी कै.मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृती सप्ताहानिमीत्त संस्थेतील विविध शाखांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे. शनिवारी ते सोमवारी दि. १ ते ३ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात होणाऱ्या ३० व्या प्रदर्शनात गुरू-शिष्यांचा कलाविष्कार पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

            ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कला आणि अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी दरवर्षी संस्थेकडून हे प्रदर्शन भरविले जाते, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदीप कदम यांनी दिली. या प्रदर्शनात विद्यार्थी आणि शिक्षकांनी साकारलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे.

            या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम. जाधव यांच्यासह संस्था सदस्य, विद्यार्थी शिक्षक उपस्थित राहणार आहेत.

            यावेळी विद्यार्थ्य़ांच्या शंभर आणि शिक्षकांच्या साठ चित्रांचे प्रदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांच्या चित्रांचे परीक्षण करून त्यातील निवड चित्रांना बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींचा स्वतंत्र गट तयार केला आहे. त्यामध्ये प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे एक हजार, पाचशे आणि तीनशे रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहे. तर दोन उत्तेजनार्थांना अडीचशे आणि दोनशे रूपये दिले जाणार आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here