आदिवासी कातकरी मुलांनीही पाहिला ‘तानाजी’ चित्रपट

0
352

अंबडवेट, ता.मुळशी येथील माजी उपसरपंच विलास अमराळे यांनी घेतला यासाठी पुढाकार

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  आदिवासी समाजाला आधुनिक जीवनशैली लाभत नाही. त्यात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट वगैरे पाहणे, हे त्यांच्यासाठी आजही अतिशय दुर्मिळ आहे. हेच जाणून अंबडवेट, ता.मुळशी येथील माजी उपसरपंच विलास अमराळे यांनी स्वखर्चातून आदिवासी कातकरी समाजातील कातकरी मुलांना “तानाजी – द अनसंग वॉरियर” हा सुप्रसिद्ध चित्रपट चित्रपटगृहात नेऊन दाखवला. त्यामुळे हे विद्यार्थी भलतेच खुश होऊन हरखून गेले होते.

             अंबडवेट, ता.मुळशी येथे कातकरी आदिवासी समाज पुर्वीपासूनच वास्तव्याला आहे. मोहोळनगर नावाने असलेल्या कातकरी वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची शाळा तसेच अंगणवाडी देखील आहे. येथील विद्यार्थ्यांना एरवी दिवाळी व इतर कार्यक्रमावेळी मिठाई तसेच शैक्षणिक किंवा वस्तूरूपाने मदतही कोणा ना कोणाकडून मिळत असते. मात्र चित्रपट पाहणे, ही अनोखी भेट आजतागायत त्यांना कोणाकडूनही मिळालेली नव्हती. ती विलास अमराळे यांच्या पुढाकाराने मिळाल्याने मुलांचे पालकही खुश झाले.

             यावेळी या विद्यार्थ्यांचे घोटवडे फाटा येथील फन स्क्वेअर चित्रपटगृहात स्वागत करण्यासाठी अमराळे यांच्यासोबत राम गायकवाड, संदीप चोरघे, नंदू सुतार, शंकर बत्ताले, जयवंत अमराळे, नवनाथ अमराळे, पाटील सर, मारणे मॅडम, टकले मॅडम, ढमाले मॅडम आदि उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here