मुळशी तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

1
817

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुळशी तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुळशी तहसिल भवन येथे तहसिलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

             श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय, पौड येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार शरद ढमाले, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, नायब तहसिलदार भगवान पाटील, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, सविता दगडे, कोमल साखरे, कोमल वाशिवले, अंजली कांबळे, सुभाष अमराळे, रामभाऊ ठोंबरे, शांताराम इंगवले, राजाभाऊ हगवणे, नानासाहेब शिंदे, आत्माराम कलाटे, महादेव कोंढरे, बाबा कंधारे, किसन नागरे, प्रकाश भेगडे, दादाराम मांडेकर, सुहास भोते, सुरेश निकाळजे, सुरेश पारखी, सुनिल वाडकर, लहू चव्हाण, आप्पासाहेब सुतार, विनायक गुजर, राम गायकवाड, प्रमोद बलकवडे, विविध मान्यवर उपस्थित होते.

             यावेळी महसूल, पौड पोलिस, पंचायत समिती पदाधिकारी व कर्मचारी आणि विविध मान्यवर यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. पौड पोलिसांनी संचलन करत झेंड्याला सलामी दिली. तर विद्यार्थ्यांच्या तबला व पेटीवादनाने उपस्थितांची मनं जिंकली.

             राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल, कासार आंबोली, ता.मुळशी येथे माध्यमिक शालेय मुलींनी जोरदार संचलन केले. विविध चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करत प्रजासत्ताक दिन साजरा केला. पिरंगुट, पौड, घोटवडे, भुगाव, अंबडवेट, कोळवण, माले परिसरातील शाळांमध्ये आणि गावांमध्ये मोठ्या उत्साहात 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळांमध्ये नृत्य, वक्तृत्व आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार कार्यक्रम घेण्यात आले.

इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल पौड, ता.मुळशी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन

             पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल पौड, ता.मुळशी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नर्सरी, एलकेजी, युकेजीचे विद्यार्थी विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून आले होते. यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ,  छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी येसूबाई, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, सैनिक, पोलिस, क्रांतीकारक, भारतमाता, सर्वधर्म समभाव जागृत करणार्या वेशभुषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.

             यावेळी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सर्जे सर, पर्यवेक्षक पिंगळे सर, मुख्याध्यापिका भाग्यश्री उबाळे, उपशिक्षिका सोनाली साळुंके, बंडू दातीर सर, अश्विनी राऊत, सारिका हुलावळे, प्रतिक्षा अनभुले, अक्षय मुरादे व विविध शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. फॅन्सी ड्रेसमुळे विद्यार्थ्यांना आपण वेगळ्याच विश्वात गेले आहोत असे वाटत होते. तर त्यांच्या वेशभुषेमुळे विविधतेत एकता जपणारा भारत देशाचा आरसा उमटला असल्याचे भासत होते.

ही बातमी शेअर करा :

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here