कासार आंबोली उपसरपंच पदी सचिन धुमाळ बिनविरोध

0
613

स्वराज्यनामा ऑनलाईन  : कासारआंबोली (ता.मुळशी) ग्रामपंचायत उपसरपंच पदी सचिन कुंडलिक धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत स्थापनेपासुन पहिल्यांदाच धुमाळ परिवारास उपसरपंच पदाचा मान मिळाला आहे.

          शेखर विठ्ठल शिंदे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सरपंच श्रध्दाली सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची सभा झाली. यामध्ये सचिन धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड केल्याचे ग्रामसेवक सुर्यकांत गायकवाड यांनी जाहीर केले.

          निवडीनंतर उपसरपंच सचिन धुमाळ यांचा मुळशी पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, सुनिल वाडकर, लहु सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे, मा.सभापती कोमल वाशिवले, नेते राजाभाऊ हगवणे, शंकर पवळे यांनी शुभेच्छा दिल्या.

          याप्रसंगी माजी सरपंच माऊली कांबळे, राजाभाऊ मारणे, गणेश सुतार, संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महेश मानकर, शेखर शिंदे, उमेश सुतार, सुरेश सुतार, मोहन शिंदे, सुवर्णा सुतार, सुवर्णा मारणे, मिना शिंदे, कामिनी शिंदे, छाया भिलारे, हिरा कांबळे, समिर शिंदे, प्रकाश सुतार, शंकर काटे, विनायक वाळके, दिलिप मुंगसे, रमेश धुमाळ, रमेश धिडे, शाम धुमाळ, शशिकांत सुतार, एकनाथ सुतार, आनंता धुमाळ, अविनाश शिंदे, बाळासाहेब शिंदे, आशा लांडगे, स्वप्निल शिंदे, शंकर सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन सागर धुमाळ, प्रास्ताविक रामभाऊ गायकवाड यांनी केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here