१९ वर्षाखालील विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भोरच्या नऱ्हे गावचा सिद्धेश वीर सामनावीर

0
662

स्वराज्यनामा ऑनलाईन :  आयसीसी युवा विश्व करंडक स्पर्धेत भोर तालुक्यातील नऱ्हे गावच्या सिद्धेश अशोकराव वीर याने चमकदार कामगिरी केली आहे. १९ वर्षाखालील क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेतील रविवार दि. १९ जानेवारी रोजी झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला नमवत विजयी सलामी दिली. या सामन्यात सिद्धेशला सामनावीर म्हणून सन्मानित केले आहे.

            सिद्धेश वीर याने या सामन्यात नाबाद ४४ धावा काढत ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार लगावले. तसेच गोलंदाजी करताना २ विकेट घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला. या स्पर्धेत सिद्धेश वीर याची अष्टपैलू कामगिरी भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची ठरली.

            या युवा विश्व करंडक स्पर्धेत भारतीय युवक संघाने आपण प्रबळ विजयाचे दावेदार आहोत हे दाखविताना श्रीलंकेला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारत या संधीचे सोने करत पुरेपूर फायदा घेत भारताच्या डावातील पाच भागीदारांपैकी एकही श्रीलंकेस झटपट मोडता आला नाही. आणि श्रीलंकेस दुसऱ्या विकेटची ८७ धावांची भागीदारी सोडल्यास श्रीलंकेची अन्य कोणतीही जोडी जमली नाही.

            सिद्धेश अशोकराव वीर याची फलंदाजी व गोलंदाजी उत्कृष्ट पाहण्यासारखी होती. भारतीय संघाच्या शानदार सलामीत सिद्धेशचा वाटा मोठा असून आदर्श आहे. त्याने केलेल्या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर व भोर तालुक्यातून व पुणे जिल्ह्यातून विविध स्तरातून सिद्धेश्वर वर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होतो आहे. सिद्धेशच्या भोर तालुक्यातील मूळ गावी नऱ्हे येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा क्षण व आनंद, सिद्धेशची कामगिरी भोर तालुका व महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here