भुगावमधील २३ कुटूंबांना आयुषमान भारत योजनेच्या आरोग्य विम्याचा लाभ

0
686

स्वराज्यनामा ऑनलाईन : आयुषमान भारत योजने अंतर्गत भुगाव, ता.मुळशी येथील २३ कुटुंबांना योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले. या योजने अंतर्गत लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष रू. ५ लाख पर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे याचा लाभार्थी कुटूंबाला फायदा होणार आहे.

              आयुषमान भारत योजने अंतर्गत कुटुंबातील सदस्यांना देशांतर्गत सर्व अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. देशातील ४९५ व पुणे शहर व ग्रामीण भागातील ३१ अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे.

              याप्रसंगी तालुका आरोग्य विस्तार अधिकारी नमिता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, सरपंच निकीता रमेश सणस, उपसरपंच अनिकेत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य सतिश इंगवले, विशाल भिलारे, राहुल काबंळे, वैशाली चोंधे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, सविता खैरे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार व ग्रामस्थं आणि लाभार्थी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here