महिलांना शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण आवश्यक – डॉ.शितल मालुसरे

0
496

स्वराज्यनामा ऑनलाईन : स्वसंरक्षणासाठी शिवकालीन युद्ध कलेची शिकवण महिला भगिनींना देणे गरजेचे आहे. त्याच वेळेस महिला समाजामध्ये सुरक्षिततेने वावरू शकतील असे मत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ.शितल मालुसरे यांनी व्यक्त केले. भुगाव येथे जनसेवा फाउंडेशन ने महिला व मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी शिवकालीन युद्धकलेच्या प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

             सध्या देशात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत त्याच धर्तीवर तालुक्यात कोणत्याही महिलांवर अशी वेळ येवू नये म्हणूनच आवर्जून या शिबिरात निःशस्त्र, लाठी काठी अशा शिवकालीन युद्धकला महिलांना शिकवण्यात येत आहे. प्रशिक्षणाचे खास वैशिष्ट्य हे आहे की, महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणाचे आयोजन केले असल्याचे प्रशिक्षक नितीन शेलार यांनी सांगितले.

             आयोजक जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष अक्षय सातपुते यांनी सांगितले की, या तालुक्यातील  महिलांनी संकट काळी कधीही आम्हाला संपर्क करावा सर्वतोपरी मदत केली जाईल. परंतु कोणताही अन्याय अत्याचाराला बळी पडू नका, असे आवाहनही केले. या शिबिरात दररोज ४०० मुली आणि महिला प्रशिक्षण घेत आहेत. तालुक्यातील महिलांकडून या प्रशिक्षणासाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना प्रतिष्ठानच्या वतीने दररोज ये जा करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वांना पौष्टिक अल्पोपहारही देण्यात येत आहे.

              या कार्यक्रमास नरविर तानाजी मालुसरे यांच्या १३ व्या वंशज डॉ.शितल मालुसरे, सरसेनापती हंबिरराव मोहिते यांचे १३ वे वंशज सुरेश मोहिते,  इतिहास संशोधक दत्तात्रय नलावडे, सभापती राधिका कोंढरे, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, सागर काटकर,  स्वाती ढमाले, लक्ष्मी सातपुते, मंगळ फाळके, दगडुकाका करंजावणे, विजय सातपुते, ग्रामपंचायत सदस्य पार्वती शेडगे, सविता खैरे, सुनीता पोळ, अजित इंगवले, दिपक करंजावणे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश घारे, पोलीस पाटील नितीन चोंधे, संतोष पवळे, राकेश कांबळे, अनिल चोंधे, बाळासाहेब शेडगे, अक्षय सातपुते, राहुल कांबळे, अनिकेत शेडगे आणि ग्रामस्थं मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

             प्रास्ताविक अनिल चोंधे यांनी केले. सुत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले तर आभार लाला पासलकर यांनी मानले.

शिवकालीन युद्ध कलांचे प्रशिक्षण घेत असताना महिला व मुलींचा उपस्थित जनसमुदाय

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here