काशिगला मोफत आरोग्य शिबिर संपन्न, महिला व बालकांना लाभ

0
432

स्वराज्यनामा ऑनलाईन : काशिग, ता.मुळशी येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. ग्रामविकास आघाडी, काशिग व माऊली फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने काशिग गावातील माता भगिनी व लहान मुलांसाठी मोफत सर्व रोग चित्किसा व मोफत औषधे वाटप कार्यक्रम या शिबिरात घेण्यात आला.

             याप्रसंगी शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, रक्तहितवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे, अॅड. भाग्यश्री चव्हाण, काशिग गाव तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नवनाथ टेमघरे, युवासेना उपतालुकाधिकारी नामदेव तिडके, काशिग गाव तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ शेळके, युवा नेते राहुल कदम, युवा सेना माजी शाखाधिकारी गणेश तिडके, शाखाधिकारी रायबा मालसुरे, शिवसेना गटप्रमुख विनायक फाटक, सामाजिक कार्यकर्ते उदय देशींगकर, प्रसाद चावरे, युवा उद्योजक सचिन टेमघरे, राकेश डफळ असंख्य महिला माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

             गावातील १७० नागरिकांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. लोकांचे ब्लड प्रेशर व शुगर चेक करण्यात आली. भारती रूगणालयाच्या डॉ.श्रेया वैद्य, डॉ.समृद्धी शिंदे यांनी रूग्णांची तपासणी करून योग्य औषध उपचार केला. लोकंनी प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी आहे. म्हणून वारंवार अशा शिबीराची गरज असल्याचे मत शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ यांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here