भुगाव येथे शाळकरी मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण

0
386

स्वराज्यनामा ऑनलाईन : भूगाव, ता.मुळशी ग्रामपंचयात मार्फत मोफत कराटे प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. १४ व्या वित्त आयोगानुसार सन २०१९-२०२० चा १० टक्के ग्राम निधी महिला व बालकल्याण यासाठी वापरण्यात येणार असुन या अभिनव उपक्रमाचा २०० मुलींना लाभ होणार असल्याची माहिती सरपंच निकिता सणस यांनी दिली आहे.

             या प्रशिक्षणाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, माजी गटनेते-जिल्हा परिषद पुणे शांताराम इंगवले, पोलीस उपनिरीक्षक मुळशी श्रीकांत जाधव याच्या हस्ते झाला.

             मुलींवर होणारया अत्याचार, लैंगिक शोषण ,या सारख्या अन्याय साठी या प्रशिक्षण चा खूप मोठा फायदा होईल असे दगडे ताई यांनी सांगितले. कराटे प्रशिक्षण मुळे मुलींचे मनगट मजबूत होणार आहे असे मा जाधव साहेब यांनी सांगितले. मुलींनी पूर्ण क्षमतेने निर्भीड पण करते प्रशिक्षण घेण्याची काळाची गरज आहे असे शांताराम इंगवले यांनी सांगितले.

             म्हाळुंगे, बालेवाडी येथे दि. २ ते ६ जानेवारी २०२० होणारया महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी तालुका चाचणी व पुणे जिल्हा निवडचाचणी मध्ये भुगावच्या कुमार गट (४२ कि.ग्रॅ.) तिलक चिंचवडे, (९२ कि.ग्रॅ.) आदित्य सांगळे, वरिष्ठ माती (७० कि.ग्रॅ.) प्रदीप वाळवे, (८६ कि.ग्रॅ.) ऋषीकेश उणेसा, गादी विभाग (७९ कि.ग्रॅ.) वैभव तांगडे, द्वितीय क्रमांक गादी विभाग (५७ कि.ग्रॅ.) अजिंक्य भिलारे, पुणे शहर प्रथम क्रमांक (९२ कि.ग्रॅ.) राजु तांगडे, द्वितीय क्रमांक (६५ कि.ग्रॅ.) सनी भागवत या भुगाव गावच्या विजयी मल्लांचा गुणगौरव भुगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

             या वेळीं उपसरपंच अनिकेत शेडगे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, सदस्य स्वस्तिक चोंधे, सतीश इंगवले, विशाल भिलारे, अक्षय सातपुते, राहुल कांबळे, अर्चना सुर्वे, सुरेखा शेडगे, वैशाली सणस, वैशाली चोंधे, सविता खैरे, पार्वती शेडगे, सुनीता पोळ, अंकुश घारे, कालिदास इंगवले, दशरथ शेडगे, निवृत्ती शेडगे, नारायण करंजावणे, जमनादास इंगवले, वसंत शेडगे, राजू करंजावणे, चंद्रकांत शेडगे, गुलाब चोंधे, दिपक करंजावणे, जीवन काबंळे, जितेंद्र इंगवले आदि उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here