मुळशीचा अपरिचित इतिहास उजेडात आणणार – दिग्दर्शक प्रविण तरडे

0
1059

श्री शिवराय पुरस्काराने तरडे आणि इतरांचा गौरव, २६२ जणांचे रक्तदान : श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशीचा लपवलेला इतिहास आगामी चित्रपटातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पिरंगुट येथे सांगितले. श्री शिवराय प्रतिष्ठान, पिरंगुट यांच्या रक्तदान शिबिर व श्री शिवराय पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. तरडे यांना मानाचा श्री शिवराय पुरस्कार आणि मुळशी तालुक्यात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा विशेष श्री शिवराय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तर २६२ जणांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे.

             श्री शिवराय प्रतिष्ठानने सलग दहा वर्षे या रक्तदान शिबिर व विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ यशस्वीरीत्या व भव्य स्वरूपात आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमास मुळशीच्या सभापती राधिका कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती महादेव कोंढरे, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक किरण दगडे, पिरंगुट सरपंच चांगदेव पवळे, माजी सभापती कोमल वाशिवले, कोमल साखरे, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, म्हाडा सदस्य स्वाती ढमाले, राम गायकवाड, गंगाराम मातेरे, शिवाजी बुचडे, विजयनाना सातपुते, दगडूकाका करंजावणे, राजेंद्र मारणे, आशिष काटे, भानुदास पानसरे, भाऊ केदारी, रमेश पवळे, मनिषा पवळे, राहुल पवळे, भानुदास गोळे, मंदा पवळे, महादेव गोळे, प्रवीण कुंभार, विकास पवळे, रामदास गोळे, प्रकाश पवळे, स्वाती गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

             तरडे पुढे म्हणाले की, मुळशी तालुक्यातील शिवकालीन अपरिचित, लपवलेला असा इतिहास उजेडात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असून पिरंगुट येथील पिलाजी गोळे व त्यांच्यासारख्या अनेक मुळशीतील कर्तबगार सरदारांची महती त्यांच्या गावासहित माझ्या पुढील चित्रपटातून उजेडात येणार आहे. मुळशी तालुक्याला भविष्यात चांगले दिवस येणार असून मुळशीकरांनी जमिनी आता हाताशी धरून ठेवल्या पाहिजेत, त्यामुळे मुळशीकर भविष्यात नक्कीच सुखी होतील.

             तरडे यांनी श्री शिवराय प्रतिष्ठान, ट्रस्टचे कौतुक करत सातत्याने सलग १० वर्ष रक्तदान शिबीर व कर्तृत्ववान लोकांचा सत्कार करून प्रतिष्ठानने आदर्श निर्माण केला असल्याचे बोलून दाखवले. रक्तदानासारखे महान काम प्रतिष्ठानने केल्याने त्याचा फायदा गरजू रूग्णांना नक्कीच उपयोग होतो. तसेच समाजात चांगले काम करणार्या कर्तृत्ववान लोकांना सन्मानित केल्याने अनेकांनाही त्यापासून प्रोत्साहन मिळते, असे मत प्रदर्शित केले.

             विशेष श्री शिवराय पुरस्काराचे मानकरी ह.भ.प.ऋषिकेश महाराज चोरघे (सांप्रदायिक/किर्तनकार), राजेंद्र मधुकर ढगे (मुख्याध्यापक – जि.प. शाळा पिरंगुट), अनिल लक्ष्मण चोंधे (माजी सैनिक), भास्कर लक्ष्मण मोहोळ (संस्थापक, मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा), प्रमोद संदिप बलकवडे (अध्यक्ष – मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती), सागर गोपीनाथ तांगडे (राष्ट्रीय कुस्ती पंच), प्रदिप तुकाराम पाटिल (पत्रकार दै.लोकमत), विजय बबनराव वरखडे (संपादक – श्वास वृत्तपत्र, स्वराज्यनामा ऑनलाईन), सुनिता अनंता पवळे (सामाजिक आरोग्य क्षेत्र), भारती प्रकाश गोळे (शिक्षिका- पिरंगुट जिल्हा परिषद शाळा), मनोज कुंडलिक पवळे (संस्थापक – मुळशी ता. स्पोर्ट्स असोसिएशन), कु.वैष्णवी दादाराम मांडेकर (राष्ट्रीय खेळाडू – किक बॉक्सिंग व कराटे) या सर्वांना भव्य अशी ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

              हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवळे, पिरंगुट उपसरपंच छाया पवळे, अक्षय सातपुते, गणेश मांडेकर, मयुर मारणे, विजय मारणे, नवनाथ चरवड, मोहन आवळे, सतिश सुतार अमित गोळे यांनी जबाबदारी पार पाडली. संतोष गावडे सर यांनी उत्स्फुर्त सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक नवनाथ चरवड तर आभार प्रदर्शन अक्षय सातपुते यांनी केले. ह.भ.प. ऋषिकेश महाराज चोरघे यांनी सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने आभार प्रगटन केले.

श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करताना सोनेरी मुळशी मित्र परिवाराचे सदस्य

              पुना सर्जिकल ब्लड बॅंक, रास्ता पेठ यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर पार पडले. एकुण २६२ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमास उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोनेरी मुळशी परिवारातील दिपक करंजावणे, विनोद माझिरे, जितेंद्र इंगवले, दीपक सोनवणे, राम मानकर, निलेश शेंडे, किशोर देशमुख, प्रविण सातव, सागर धुमाळ, भाऊ मरगळे, ज्ञानेश्वर पवळे, चंद्रकांत चोरघे, सचिन तापकीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

              श्री शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने आत्तापर्यंत तीनशे ते सव्वातीनशे रूग्णांना मोफत रक्त प्रदान करण्यात आले आहे. शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदत, किल्ल्यांवर स्वच्छता असे अनेक उपक्रम श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट आत्तापर्यंत राबवत आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष पवळे यांनी स्वराज्यनामाशी बोलताना दिली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here