“मी आत्महत्या करतोय…” तरूणाचा मेसेज, पोलिसांच्या तत्परतेने युवकाला जीवदान

0
1094

स्वराज्यनामा ऑनलाईन :  एखाद्या चित्रपटाला साजेशी वाटेल अशी घटना भुगाव, ता.मुळशी येथे आज घडली. एक युवक आत्महत्या करत असल्याची माहिती सदर युवकाकडूनच नियंत्रण कक्षाला मिळते, त्याची दखल घेत तत्काळ पौड पोलिसांकडून पावले उचलली जावून त्या युवकाला वाचवण्यात यश मिळवतात. असा थोडासा फिल्मी पण वास्तव व दुर्घटना घडू शकणारा प्रकार रोखल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

               मी प्रवीण पवार… रा. स्क्वेअर मेमरीज इमारत, माताळवाडी फाटा, भुगाव, ता. मुळशी… मी माझ्या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करीत आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. नियंत्रण कक्षाकडून ही माहिती पौड पोलिसांना लागलीच कळवली जाते. वेळीच पौड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्या युवकाचे प्राण वाचवितात, त्यामुळे नागरीकही खुश होऊन पोलिसांना शाबासकी देत आहेत.

               याबाबत पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले की, प्रवीण पवार (रा. स्क्वेअर मेमरीज इमारत, माताळवाडी फाटा, भुगाव, ता. मुळशी) याने मी माझ्या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करीत माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने तात्काळ पौड पोलिसांना ही माहिती दिली. ठाणे अंमलदार श्री.कांबळे यांनी माहिती मिळताच बिट अंमलदार एस.राक्षे यांना कळविले. एस.राक्षे व होमगार्ड भरत शेडगे हे याठिकाणी आले.

               येथे चौकशी केली असता प्रवीण पवार नावाची व्यक्ती येथे राहत नसल्याचे लोकांनी सांगितले. पोलिसांनी शेजारील फ्लॅटमध्ये चौकशीसाठी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता समोरच सोफ्यावर पवारने आपल्या डाव्या हाताची मनगटाची नस कापलेली दिसली. पोलिसांनी हातावर रुमाल बांधून त्याला तत्काळ जमलेल्या लोकांचे मदतीने समोरच असलेल्या युनिक हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.

               योग्यवेळी उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले आहे. हा युवक कराड, (जि.सातारा) येथील असल्याचे समजले असे असून त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधून माहिती दिली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here