फेडररकडून सुमितच्या पाठीवर कौतुकाची थाप; तुझे भविष्य उज्वल

0
269

जवळपास २५ वर्षानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रवेश करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय खेळाडू सुमित नागलचा युएस ओपनमध्ये पहिलाच सामना रॉजर फेडरर बरोबर होता. या मोठ्या सामन्यात २२ वर्षीय सुमितने पहिल्या सेटमध्ये फेडररला चांगलाच धक्का दिला. त्याने पहिला सेट ६-४ असा जिंकत २० ग्रँडस्लॅम नावावर असलेल्या फेडररला पिछाडीवर टाकले. पण, त्यानंतर फेडररने पुनरागमन करत पुढचे तिन्ही सेट जिंकत सुमितचा ६-४, १-६, २-६, ४-६ असा पराभव केला. सुमितचा या सामन्यात पराभव झाला असला तरी त्याने फेडररला विजयासाठी २ तास ४९ मिनिटे झुंजवल्याने त्याने चाहत्यांची मने जिंकली. खुद्द फेडररनेही सुमितच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here