पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पौड येथे शालेय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा संपन्न

0
752

स्वराज्यनामा ऑनलाईन : माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पौड येथे विज्ञान प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पौड येथील इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल येथे १० व ११ डिसेंबर रोजी विविध क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. १२ व १३ डिसेंबर रोजी श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवण्यात आले.

             विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन मुळशी तालुका सभापती राधिका कोंढरे, माजी सभापती रविंद्र कंधारे, पौड गावच्या सरपंच धनश्री दहितुले यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. सर्जे, इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल मुख्याध्यापिका भाग्यश्री उबाळे, प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनासोबत रांगोळी प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, हस्तकला प्रदर्शन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

             नर्सरी व एलकेजी विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ तर युकेजी व १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी आणि शिक्षणाशी संबंधित प्रकल्प आणि खेळ बनवून आणले होते. एकुण ८४ प्रकल्प सादर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षिका प्रतिक्षा अनभुले यांनी चांद्रयानाची प्रतिकृती बनवली होती. शिक्षिका सोनाली साळुंके यांनी शाश्वत शेती आणि पाण्याचा पुनःर्वापर यावर आधारीत प्रकल्प केला होता. तर शिक्षिका सारिका हुलावळे यांनी वॉटर डिस्पेन्सर हा प्रकल्प सादर केला होता.

             विद्यार्थ्यांसोबत शिक्षिकांनी देखील रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. उत्कृष्ट रांगोळीचा मान शिक्षिका अश्विनी राऊत यांनी पटकावला. प्रदर्शनाचे व स्पर्धांचे परिक्षण विद्यालयाचे प्राचार्य व्ही. सर्जे सर, पर्यवेक्षक पिंगळे सर, माध्यमिक विभागशिक्षक येळे सर, काळभोर सर, कांबळे सर यांनी केले.

             प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या सर्व पालकांनी, पाहुण्यांनी व परिक्षकांनी उत्कृष्ट प्रदर्शन आणि स्पर्धांसाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री उबाळे, उपशिक्षिका सोनाली साळुंके, अश्विनि राऊत, सारिका हुलावळे, प्रतिक्षा अनभुले, शितल पांचाळ आणि अक्षय मुरादे यांचे कौतुक केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here