माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिडा स्पर्धेचे आयोजन
स्वराज्यनामा ऑनलाईन : शेरे (ता. मुळशी) येथे पार पडलेल्या गट पातळीवरील तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत पिरंगुट येथील पिरंगुट इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजने दमदार बाजी मारली. एकूण चार गटात प्रथम क्रमांक मिळवित शाळेने घवघवीत यश संपादन केले.
शेरे येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात पौड गट पातळीवरील कबड्डी स्पर्धा आयोजित संपन्न झाल्या. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन माजी सरपंच हनुमंत सुर्वे, बाळासाहेब सुर्वे, माजी चेअरमन चंद्रकांत ढमाले, माजी मुख्याध्यापक आबा देशमुख, कोळवण शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सात शाखांमधील मुलामुलींचे असे एकूण 28 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. ई. भोसले, गायकवाड मॅडम, कोळी सर, गवळी सर, भोसले सर, वरबगावकर मॅडम, सेवक पी. एस. दातीर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. पी. शिंदे यांनी केले.
स्पर्धेतील गटनिहाय प्रथम क्रमांक विजेते पुढीलप्रमाणे
१४ वर्षे मुले
पिरंगुट इंग्लिश स्कुल
१४ वर्षे मुली
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड
१७ वर्षे मुले
पिरंगुट इंग्लिश स्कुल
१७ वर्षे मुली
पिरंगुट इंग्लिश स्कुल स्कुल
१९ वर्षे मुले
पिरंगुट इंग्लिश स्कुल
१९ वर्षे मुली
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड