भोरचे ज्येष्ठ वकील विजय भाऊ मुकादम ‘पंताजी काका बोकील अभिवक्ता’ पुरस्काराने सन्मानित

0
200

स्वराज्यनामा ऑनलाईन, भोर (प्रतिनिधी) : “आदर्श निस्पृह विधिज्ञ अर्थात (वकील) “पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार” भोरचे कायदेशीर नीतिमूल्ये जपणारे ज्येष्ठ वकील विजय भाऊ मुकादम यांना प्रदान करण्यात आला आहे. शिवतीर्थ श्री क्षेत्र वाई, ता. वाई, जिल्हा-सातारा येथे महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ मान्यवर व शिव प्रताप समिती पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतापदीनी अर्थात अफजलखान वधाच्या आनंदोत्सव दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

             या कार्यक्रमा प्रसंगी पंडित दादा मोडक (संस्थापक गो,शाळा पुणे), प्रतिभा शिंदे (नगराध्यक्षा वाई नगरपालिका), विनायक सणस (संघचालक भोर), अनिल सावंत (उपनगराध्यक्ष वाई नगरपालिका), चंद्रकांत काळे (अध्यक्ष, वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक-वाई), बाबुजी नाटेकर (विश्व हिंदू परिषद) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन वाई प्रतापगड उत्सव समिती वाई चे विजयाताई भोसले सुहास पानसे  व प्रतापगड उत्सव समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी  केले .

             गेली 30 वर्षांहून अधिक काळ भोर, पुणे, सातारा जिल्ह्यात प्रभावी व कार्यक्षम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत वकिली व्यवसाय सेवा करणारे वकील विजय मुकादम हे आहेत. गोरगरीब, अन्यायग्रस्त, वंचित, शोषित, पीडित नागरिकांना, अशिलांना न्याय मिळवून देण्यात मुकादम यांचा मोलाचा वाटा आहे. अन्याय होणाऱ्या शेतकरी, मजूर, महिला, गोरक्षक, समाजातील दुर्लक्षित घटक यांना सुयोग्य कायदेशीर सल्ला मोफत व अचूक देऊन न्याय मिळवून देत आहेत.

              त्यांच्यातील सचोटी, प्रामाणिकपणा, निर्भीड वृत्ती, कोणत्याही आमिषाला, प्रलोभनाला बळी न पडण्याचा व आशिलाला न्याय मिळवून देण्याचा स्वभाव व  माणुसकीचे दर्शन घडविणारे व रोखठोक स्वभाव, अन्यायास जोरदार प्रहार करण्याचा बाणा, आपल्या आशिलाची सुयोग्य बाजू स्पष्टपणे मांडुन न्यायदानाचे अविरत कार्य करत आहेत. याचीच दखल शिवप्रताप समिती वाई यांनी घेऊन त्यांना पंताजी काका बोकील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भोर तालुक्यातून पुणे व सातारा जिल्ह्यातून तसेच समाजातील सर्व स्तरातून व वकील संघटनेकडून वकील विजय मुकादम यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

            वकील हा व्यवसाय नसतो, तर ते समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. हे मी कृतीतून दाखवून अन्यायग्रस्त नागरिकांच्या अंधकारमय आयुष्यात न्यायाची ज्योत पेटवून त्यांचे जीवन सुकर करीत आहे, चांगलं काम केल्यास समाज निश्चितच त्याची दखल घेतो, असे मत पुरस्कारार्थी वकील विजय मुकादम यांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here