मुळशीतील वैष्णवी मांडेकरची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

0
731

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रतिनिधीत्वाचीही जबाबदारी, कसून सराव चालू

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुळशीकर कन्या वैष्णवी मांडेकर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता निवड झाली आहे. उत्तरप्रदेशातील मेरठ येथे १९ ते २२ डिसेंबर रोजी ही स्पर्धा होत असून वैष्णवी त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षावही केला जात आहे.

             सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय स्पर्धा वाघोली येथील बीजेएस महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत पुण्यातील मार्डन महाविद्यालयाकडून खेळणारी राष्ट्रीय खेळाडू मुळशीची सुवर्णकन्या वैष्णवी दादाराम मांडेकर हिने ८१ किलो वजन गटात बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिची चमकदार कामगिरी पाहून उत्तरप्रदेशातील मेरठ येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता तिची निवड झाली. या स्पर्धेत ती पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याने त्यासाठी स्पर्धेची कसून तयारी ती करत आहे.

             वैष्णवी पुण्यातील मार्डन महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्य़ा वर्षात शिक्षण घेत असून गतवर्षी झालेल्या जागतिक महिलादिनी तिने मातोल क्रीडा प्रकारात सहा इंच खिळ्यांवर झोपून अवघ्या पाच मिनीटे चोविस सेकंदात एक टन फरशा फोडण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे.

             ती आता स्वारगेट येथे पिंगळे स्पोर्ट अँकेडमी मध्ये अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाँक्सींग चा सराव करत आहे. नुकत्याच अकोला येथे झालेल्या सिनीयर स्टेट (वरिष्ठ महिला) गटात बाँक्सींग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. तर पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलामध्ये झालेल्या आखिल भारतीय कराटे व किक बाँक्सींग नॅशनल चँम्पीयन स्पर्धे्तही सुवर्णपदक घेत वर्चस्व राखले होते.

             तिने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल माँडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव व क्रीडाप्रशिक्षक विक्रम फाले यांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या कामगिरीचे समाजाच्या सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. आता उत्तरप्रदेशला होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून पुणे विद्यापीठाचा नाव लौकिक राखणार असल्याचे वैष्णवीने सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here