रामनदी स्वच्छतेसाठी भुगाव ग्रामपंचायतीकडून १.१३ कोटीच्या कामाचा शुभारंभ

0
527

स्वराज्यनामा ऑनलाईन :  भुगाव, ता.मुळशी येथील रामनदी स्वच्छ राहण्यासाठी अभिनव उपक्रम सरपंच निकीता रमेश सणस यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. यातून विविध कामं केली जाणार असून नुकतीच त्यास सुरवात करण्यात आली आहे.

              श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते स्मशान भुमी पर्यंत पहिल्या टप्प्यातील ड्रेनेज कामाचा शुभारंभ करण्यात आला. या ड्रेनेज कामासाठी १ कोटी १३ लाख रूपये तरतुद केली आहे. उर्वरित ड्रेनेज काम स्मशान भुमी ते मनपा हद्दी पर्यंत दुसर्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असुन त्यासाठी ५० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे असे सरपंच निकिता सणस यांनी सांगितले.

              ग्रामपंचायत मार्फत खुप मोठे काम हातात घेतले असुन काम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे तसेच काम पुर्ण झाल्यावर गृह प्रकल्पासाठी ड्रेनेज जोडणी फी ग्रामपंचायत मार्फत आकारणी करण्यात यावी त्यामुळे भविष्यात या ड्रेनेज कामाची देखभाल दुरुस्ती बाबत ग्रामपंचायतीला सोयिस्कर होईल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांनी सांगितले.

              यावेळी उपसरपंच अनिकेत शेडगे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार मा.उपसरपंच राहुल शेडगे, स्वस्तिक चोंधे, कुलदीप शेडगे, दिपक करंजावणे, ग्रामपंचायत सदस्य सतिश इंगवले, विशाल भिलारे, राहुल काबंळे, वैशाली चोंधे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, सुनिता पोळ, सुरेखा शेडगे, पार्वती शेडगे, सविता खैरे, तालुका भाजपा महिला अध्यक्षा वैशाली सणस, जितेंद्र इंगवले, सरपंच भगवान सणस, मा.पोलिस पाटील कालिदास इंगवले, मा.तंटा मुक्ती अध्यक्ष शांताराम करंजावणे, निवृत्ती शेडगे, कैलास चोंधे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश घारे, पो.पा.नितीन चोंधे, शिवाजी तांगडे, जमानादास इंगवले, गुलाब सणस, नारायण करंजावणे, राजु करंजावणे, धोंडिबा चोंधे, सोपान सुर्वे, राम शेडगे, संजय सातपुते, मनोहर सणस, बाळकृष्ण सुर्वे, तुकाराम करंजावणे, चंद्रकांत शेडगे, बाळासाहेब चोंधे, रोहिदास शेडगे, बाजीराव शेडगे, माऊली सातपुते, बंडू चोंधे, भरत इंगळे, विशाल सुर्वे, प्रदिप चोंधे, अतुल इंगवले, नितीन शेडगे, अमित शेडगे, विनोद सातपुते, सुयश चोंधे, रूपेश चोंधे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थं उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here