हिंजवडी-माण आयटीनगरी जवळ मुलखेड, ता.मुळशी येथे बिबट्या जेरबंद

0
5491

स्वराज्यनामा ऑनलाईन :  हिंजवडी-माण आयटीनगरीच्या जवळच असलेल्या मुलखेड, ता.मुळशी येथे बिबट्याला जिवंत पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार दि. 4 रोजी रात्री 10 वाजता वनविभागाच्या पिंजर्यात हा बिबट्या अलगद सापडला आहे. आयटी नगरीच्या फेज 3 जवळील चांदे फाट्याच्या पुढे आयनाळ वस्तीतल्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता.

            मुलखेड या गावात बिबट्याचा वावर असल्याच्या अनेक दिवसापासून खबरी येत होत्या. लोकांनी त्याला पाहिले असल्याची शक्यता असल्याने वनविभागाने पिंजरा लावण्याची कार्यवाही सुरू केली होती. मंगळवारी लावलेल्या पिंजर्यात बिबट्या सापडला नव्हता. मात्र बुधवारी पिंजर्याची जागा बदलण्यात आली होती. बिबट्यासाठी भक्ष्यही पिंजर्यात ठेवण्यात आले होते. भक्ष्याचा ठाव घेत ते फस्त करण्यासाठी बिबट्या पिंजर्यात शिरला असता पिंजर्याची किमया कामी येवून तो जेरबंद झाला.

मुलखेड, ता.मुळशी येथे पिंजर्यात सापडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करताना

            जवळच घर असलेल्या लोकांना त्याचा आवाज येऊ लागल्याने त्या लोकांनी गावात कळवले. त्यानंतर तिथे वन विभागाचे अधिकारी, रेस्क्यू टीम, ग्रामस्थं, तरूण त्वरित आले. बिबट्याचा पिंजरा कापडाने झाकून त्याला रेस्क्यू व्हॅनमध्ये चढवण्यात आला. हा जेरबंद बिबट्या जुन्नरला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी पी.व्ही.कापसे यांनी सांगितले.

            बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी भुगाव येथून रेस्क्यू टीम त्वरित घटनास्थळी आली होती. त्यातील 7-8 जण या कारवाईत सहभागी झालेले होते. वन अधिकारी कापसे, वनपाल मीरा केंद्रे, हिरेमठ, ग्रामस्थं व तरूण यांनी यात रेस्क्यू कामी मदत केली. मुलखेडचे माजी सरपंच बाळासाहेब तापकीर, सुखदेव तापकीर, ग्रामस्थं येथे उपस्थित होते.

            मुळशी तालुक्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने वनविभागाचे कौतुकही यानिमित्ताने होत आहे. दरम्यान बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाल्याने गावकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पहा व्हिडीओ : पिंजर्यात अडकलेला बिबट्या

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here