भूगावमध्ये जागतिक अपंग दिन उत्साहात, दिव्यांग बांधवांना लाभ

0
449

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  जागतिक दिव्यांग दिना निमित्त 5% राखीव निधीतून दिव्यांग बांधवांना भुगाव येथे धनादेशाचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत भुगाव, ता.मुळशी यांच्यावतीने या धनादेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

            दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी ग्रामपंचायत निधीतील राखीव 5 टक्के निधी दिव्यांग बांधवांना वाटायचे ग्रामपंचयातने ठरवले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेशांचे वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले होते.  ग्रामपंच्यातच्या स्वउत्पन्नातून अपंगांच्या कल्याणासाठी निधी देण्यात आला असून त्याचा योग्य विनियोग करण्यात यावा असे मा सरपंच निकिताताई सणस यांनी सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन केले.

            यावेळी उपसरपंच अनिकेत शेडगे, ग्राम विकास अधिकारी मदन हरिभाऊ शेलार, सदस्य संजीव चोंधे, विशाल भिलारे, राहुल कांबळे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, सुरेखा शेडगे, वैशाली चोंधे, सविता खैरे, सुनीता पोळ, तंटामुक्त अध्यक्ष अंकुश घारे, जमानादास इंगवले, नारायण करंजावणे, चंद्रकांत शेडगे, संतोष सुर्वे, काळूराम चोंधे, उत्तम मिरघे, माया चोंधे, तेजस चोंधे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here