लवळे येथे बालक सभेचे आयोजन, बालकांसाठी विविध सुविधांची मागणी

0
644

लवळे, ता.मुळशी येथे बालक सभेसाठी उपस्थित असलेली शालेय मुले.

स्वराज्यनामा ऑनलाईन : लवळे, ता.मुळशी येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये बालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय मुलांना विविध माध्यमातून मदत करण्यात यावी यावर विचारमंथन करून कार्यवाही करण्यात आली.

             गावाच्या विविध विकास कामा सोबत रस्ते, लाईट, पाणी जसे आवश्यक असते त्याच बरोबर गावातील मुलांचा शररिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास व्हावा मुलांना शिक्षणा सोबत आवश्यक असणाऱ्या विविध मागण्या मंजूर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खेळासाठी कपडे, भजन साहित्य, शौचालय स्वछता, फिल्टर पाणी अशा अनेक गोष्टींची मागणी करण्यात आली.

             यावेळी सरपंच स्वाती कदम, ग्रामविकास अधिकारी बापूराव पिसाळ, मा. सरपंच राणी अल्हाट, वैशाली सातव, मा.उपसरपच भाऊ केदारी, चांगदेव सातव, कुलदीप गोठे, पोलीस पाटील संपत राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य कृष्णा सुर्वे, किरण सुर्वे,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कदम, राजु केदारी, धनंजय गावडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय मारणे व शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here